AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

RR vs RCB : लावा ताकद, आरसीबीच्या मॅचविनर बॉलरची Playing 11 मध्ये एन्ट्री, राजस्थान हॅट्रिकपासून रोखणार?

Josh Hazelwood RCB Against RR Playing 11 : जोश हेझलवूड रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या प्रमुख गोलंदाजांपैकी एक आहे. हेझलवूडने आरसीबीला 18 व्या मोसमात आयपीएल चॅम्पियन करण्यात बॉलिंगने प्रमुख भूमिका बजावली होती. जोशने आयपीएल कारकीर्दीती किती विकेट्स मिळवल्या आहेत? जाणून घ्या.

RR vs RCB : लावा ताकद, आरसीबीच्या मॅचविनर बॉलरची Playing 11 मध्ये एन्ट्री, राजस्थान हॅट्रिकपासून रोखणार?
Josh Hazelwood RCBImage Credit source: PTI
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Apr 10, 2026 | 10:19 PM
Share

आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील (IPL 2026) 16 व्या सामन्यात 2 अजिंक्य आणि चॅम्पियन्स संघ आमनेसामने आहेत. गुवाहाटीतील बारसापारा क्रिकेट स्टेडियममध्ये राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात कडवी झुंज आहे. आरसीबीचा 19 व्या हंगामातील हा तिसरा तर राजस्थानचा रॉयल्सचा चौथा सामना आहे. दोन्ही संघांनी या मोसमात खेळेलेले सर्व सामने जिंकले आहेत. पावसामुळे प्रभावित झालेल्या या सामन्याला 1 तास 10 मिनिटांच्या विलंबाने सुरुवात झाली. सामन्यातील पहिला चेंडू पावसामुळे संध्याकाळी साडे सातऐवजी रात्री 8 वाजून 40 मिनिटांनी टाकण्यात आला.

आरसीबीत मॅचविनरची एन्ट्री, गतविजेत्यांची ताकद दुप्पट

राजस्थानचा हा चौथा आणि बंगळुरुचा तिसरा सामना आहे.  राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यातून आरसीबी टीमममध्ये मॅचविनर आणि अनुभवी वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड याची एन्ट्री झाली आहे. जोश हेझलवूड याला जेकब डफी याच्या जागी प्लेइंग ईलेव्हनमध्ये संधी देण्यात आली आहे. आरसीबीने हा एकमेव बदल केला आहे. जोशने आरसीबीला गेल्या मोसमात (IPL 2025) आयपीएल ट्रॉफी जिंकून देण्यात प्रमुख योगदान दिलं होतं. त्यामुळे आरसीबी फ्रँचायजीने जोशसाठी 10 कोटींपेक्षा जास्त रक्कम मोजून त्याला आपल्यासोबत कायम ठेवलं. आरसीबीने जोशला मिनी ऑक्शनआधी 12 कोटी 50 लाख रुपयांत रिटेन केलं होतं.

जोश अनेक महिन्यांपासून दुखापतीसह झगडत होता. त्यामुळे जोशच्या कमबॅकची आरसीबी चाहत्यांना प्रतिक्षा होती. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने जोश फिट असल्याचं ना हरकत प्रमाणपत्र (Noc) दिलं. त्यानंतर जोशचा अखेर प्लेइंग ईलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला.

जोशची 18 व्या मोसमातील कामगिरी

जोश आरसीबीसाठी गेल्या मोसमात 12 सामन्यांत खेळला. जोशने आरसीबीसाठी या 12 सामन्यांत 20 पेक्षा अधिक विकेट्स मिळवल्या. जोश 22 विकेट्स घेण्यात यशस्वी ठरला होता. जोशने या दरम्यान एका सामन्यात 4 विकेट्स घेण्याची कामगिरी केली होती.

लाईव्ह स्कोअरकार्ड

जोश हेझलवूड याची आयपीएल कारकीर्द

दरम्यान जोश हेझलवूड याने आतापर्यंत आयपीएल स्पर्धेत एकूण 40 सामने खेळले आहेत. जोशने या 40 सामन्यांमधील 39 डावांत 20.98 च्या सरासरीने आणि 8.28 च्या इकॉनमीने एकूण 39 विकेट्स मिळवल्या आहेत. जोशची 25 धावांच्या मोबदल्यात 4 विकेट्स ही आयपीएलमधील एका सामन्यातील सर्वोत्तम कामगिरी आहे. जोशने एकूण 2 वेळा 4 विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे. त्यामुळे जोश आता 19 व्या मोसमाची सुरुवात कशी करतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?