Supriya Sule On Baramati Election | रिश्ते मायने रखते है म्हणत सुप्रिया सुळेंचा सुनेत्रा पवारांना पाठिंबा
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेतल्यानंतरही निवडणूक बिनविरोध होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. पंढरपूर येथे विठ्ठल दर्शनानंतर माध्यमांशी बोलताना सुळे म्हणाल्या की, “आपण एक मतदार म्हणून बारामतीला मतदान करायला जाणार आहोत. अजित पवार गटाने प्रचारासाठी विचारले तर त्यावर विचार करू. शेवटी रिश्ते मायने रखते है.”
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेतल्यानंतरही निवडणूक बिनविरोध होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. पंढरपूर येथे विठ्ठल दर्शनानंतर माध्यमांशी बोलताना सुळे म्हणाल्या की, “आपण एक मतदार म्हणून बारामतीला मतदान करायला जाणार आहोत. अजित पवार गटाने प्रचारासाठी विचारले तर त्यावर विचार करू. शेवटी रिश्ते मायने रखते है.” दरम्यान, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या महायुतीच्या उमेदवार असून त्यांच्या विजयाची शक्यता मजबूत मानली जात आहे. काँग्रेसने आकाश मोरे यांची उमेदवारी मागे घेतल्याने त्यांच्या मार्गातील मोठा अडथळा दूर झाला आहे. सुनेत्रा पवार किती मताधिक्याने विजयी होतील, यावर प्रतिक्रिया देताना सुळे यांनी थेट उत्तर देणे टाळले. “महाराष्ट्रातील बळीराजाला सुख, शांती आणि समाधान मिळावे, अशीच विठ्ठलाला प्रार्थना केली आहे,” असे त्या म्हणाल्या. निवडणूक बिनविरोध का झाली नाही, या प्रश्नावर सुळे यांनी अप्रत्यक्षपणे अजित पवार गटावर निशाणा साधला. “हा प्रश्न त्यांनाच विचारा,” असे त्यांनी सांगितले. “राजकारणात सत्ता आणि पैसा येत-जात असतो, पण सुख-दुःखात कुटुंबच कामी येते,” रिश्तेही मायने रखते है… असं म्हणत आपण सोबत असल्याचही सुळे म्हणाल्या.
Published on: Apr 10, 2026 05:15 PM
सुनेत्रा पवार यांचे अध्यक्षपद अवैध? थेट नोटीस पाठवल्याने एकच खळबळ;
पेपरफुटीतील एकालाही सोडणार नाही! दादा भुसेंचा मोठा इशारा...
लग्न झाल्याच्या दीड वर्षातच भयंकर.... एकीकडे लेकीच्या बारशाची लगबग
सुरत बायपासवर मृत्यूचा सापळा! कंटेनरच्या धडकेत 5 वर्षीय चिमुकल्यासह वड

