AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतीयांच्या घरात सोने नेमके आहे तरी किती ? जगातील 10 सेंट्रल बँकांच्या सोन्याहून जास्त

भारतातील घरात जमा असलेले सोने हे जगातील १० सेंट्रल बँकांच्या तिजोरीत असलेल्या सोन्याच्या साठ्यांहून अधिक आहे. ASSOCHAM संघटनेने यासंदर्भात अहवाल जारी केला आहे.

भारतीयांच्या घरात सोने नेमके आहे तरी किती ? जगातील 10 सेंट्रल बँकांच्या सोन्याहून जास्त
gold reserves
| Updated on: Apr 10, 2026 | 10:16 PM
Share

भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी एक महत्वाचा अहवाल समोर आला आहे. ज्यामुळे देशाची पारंपारिक बचतीच्या ताकदीला नव्या नजरेने दाखवले आहे.उद्योग संघटन ASSOCHAM च्या मते भारतीय घरात असलेले सोन्याचे भंडार आता जगातील प्रमुख १० केंद्रीय बँकांच्या एकूण गोल्ड रिझर्व्हहून जास्त झाले आहे. हे न केवळ भारताच्या सांस्कृतिक प्राथमिकतेला दर्शवते, तसेच देशाच्या जवळ एका विशाल लपलेल्या आर्थिक ताकदीलाही दर्शवते. ज्यास योग्य दिशेने वापरले तर अर्थव्यवस्थेला नव्या उंचीवर पोहचवता येईल.

अहवालानुसार भारतीय घरात साठवलेल्या सोन्याची एकूण किंमत सुमारे ५ ट्रिलियन डॉलर म्हटली जात आहे. हा खाजगी संपत्तीचा एक खूप मोठा भाग आहे आणि जागतिक स्तरावर कोणत्याही देशाच्या घरगुती गोल्ड स्टॉकहून जास्त आहे. रंजक गोष्ट म्हणजे भारताचे अधिकृत गोल्ड रिझर्व्ह सुमारे ८८० टन आहे. ज्यात देश जगात आठव्या स्थानावर आहे.परंतू घरगुती पातळीवर घरात साठवलेले सोने याहून अधिकपट जास्त आहे.

अर्थव्यवस्थेला चालना मिळू शकते

ASSOCHAM संघटनेच्या मते सोन्याच्या छोट्या हिश्श्याला जर फायनान्स सिस्टीममध्ये आणले गेले तर त्याचा मोठा आर्थिक परिणाम होऊ शकतो. असा अंदाज आहे की दरवर्षी घरगुती सोन्याचा केवळ दोन टक्के वाटा फायनान्शिय इंस्ट्रुमेंट्समध्ये ट्रान्सफर केला तर तो २०४७ पर्यंत भारताच्या जीडीपीत ७.५ ट्रिलियन डॉलरचा अतिरिक्त वाढ होऊ शकते. जर भारताचा जीडीपी २०४७ पर्यंत सुमारे ३४ ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहचला तर हा वाढून ४१.५ ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहचू शकते. म्हणजे सोने केवळ दागिने वा बचतीचे साधन नाही तर आर्थिक ग्रोथचे इंजिन बनू शकते.

कोणत्या सेक्टरना होईल फायदा ?

घरगुती सोने फायनान्स सिस्टीममध्ये आणल्याने मॅन्युफॅक्चरिंग, इंफ्रास्ट्रक्चर आणि एग्रीकल्चरसारख्या महत्वाच्या सेक्टरना थेट फायदा मिळू शकतो. यामुळे गुंतवणूक वाढेल. रोजगाराच्या संधी वाढतील आणि कंझम्पशन वेगाने होईल. सोन्याचे मौद्रकरण, गोल्ड -लिंक्ड सेव्हींग स्कीम आणि गोल्ड लोन सारख्या माध्यमातून यास प्रोडक्टिव्ह एसेटमध्ये बदलता येऊ शकतात. अलिकडील वर्षात गोल्ड लोन सेगमेंटमध्ये तेजी आली आहे. आता सोने पारंपारिक बाजारातून निघून एका मुख्य धारेच्या रिटेल लँडिंग कॅटगरी बनत चालले आहे.

गोल्ड लोन आणि वाढती मागणी

आर्थिक वर्षे २०२५-२६ मध्ये नोव्हेंबर २०२५ पर्यंत गोल्ड आणि ज्वेलरीच्या बदल्यात दिलेल्या लोनचा आकडा २४.३४ लाख कोटी रुपयांपर्यंत पोहचला आहे. यावरुन कळते की लोक त्यांच्या सोन्याचा वापर स्टोअर करण्याऐवजी त्याचा आर्थिक घडामोडीत वापर करत आहेत.

वाढत्या किंमतीवर परिणाम –

२०२४-२५ आणि २०२६ च्या सुरुवातीला सोन्याची किंमतीत आलेल्या उसळीने किंमतीला अधिक वाढवले आहे. यामुळे कुटुंबाची बँलन्स शिट मजबूत झाली आहे. आणि याचा सकारात्मक परिणाम खप आणि गुंतवणूकीवर पडत आहे.

Follow Us
दिल्लीत मोठ्या घडामोडी! आज ‘लहरा दो तिरंगा’ रॅली; सेंट्रल पार्क बंद,
दिल्लीत मोठ्या घडामोडी! आज ‘लहरा दो तिरंगा’ रॅली; सेंट्रल पार्क बंद, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र.....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे....
मटका व्यावसायिकाला VIP दर्शन घडवलं; तुळजाभवानी मंदिराच्या व्यवस्था....
Tuljabhavani Temple : मटका व्यावसायिकाला VIP दर्शन घडवलं; तुळजाभवानी मंदिराच्या धार्मिक व्यवस्थापकावर थेट....
कुणाल कामरा याच्या त्या पोस्टनंतर पुन्हा वादाची ठिणगी पडण्याची शक्यता
Kunal Kamra : कुणाल कामरा याच्या त्या पोस्टनंतर पुन्हा वादाची ठिणगी पडण्याची शक्यता
सुप्रीम कोर्टाची माफी मागतो, पण आम्हाला न्याय हवा, संजय राऊत....
Sanjay Raut : सुप्रीम कोर्टाची माफी मागतो, पण आम्हाला न्याय हवा, संजय राऊत स्पष्टच म्हणाले....
धाराशिवमध्ये FDA चा दणका; 15 दिवसांत सहा हॉटेल्सचे परवाने निलंबित
Dharashiv FDA Action : धाराशिवमध्ये FDA चा दणका; 15 दिवसांत सहा हॉटेल्सचे परवाने निलंबित
महायुतीत तिन्ही पक्षांचा एकमेकांना चेकमेटचा प्रयत्न; पडद्यामागे काय?
Mahayuti : महायुतीत तिन्ही पक्षांचा एकमेकांना चेकमेटचा प्रयत्न; पडद्यामागे काय घडतंय?
10 कोटींची सुपारी फक्त कागदोपत्रीच नष्ट; त्या नेत्याने दिली माहिती....
FDA : 10 कोटींची सुपारी फक्त कागदोपत्रीच नष्ट; त्या नेत्याने दिली माहिती, FDA च्या पाच अधिकाऱ्यांवर थेट...
आज मुंबईच्या आझाद मैदानात सीजेपीचं लहरा दो तिरंगा आंदोलन...
CJP Protest : आज मुंबईच्या आझाद मैदानात सीजेपीचं लहरा दो तिरंगा आंदोलन...
डोंगराळे प्रकरणी आरोपीला फाशी की जन्मठेप? आज होणार निर्णय...
Malegaon Case | डोंगराळे प्रकरणी आरोपीला फाशी की जन्मठेप? आज होणार निर्णय...