AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आधी बसमध्ये आदळले, नंतर नदीत गुदमरले… बस नदीत कोसळल्याने 17 प्रवाशांचा एकाचवेळी मृत्यू

मोठी बातमी समोर येत आहे, बसचा भीषण अपघात झाला आहे, बस नदीमध्ये कोसळली. या अपघातामध्ये 17 जणांचा मृत्यू झाला असून, 28 जण जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

आधी बसमध्ये आदळले, नंतर नदीत गुदमरले... बस नदीत कोसळल्याने 17 प्रवाशांचा एकाचवेळी मृत्यू
bus accidentImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Feb 23, 2026 | 4:13 PM
Share

मोठी बातमी समोर येत आहे, बस नदीमध्ये कोसळून भीषण अपघात झाला आहे, या अपघातामध्ये आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. तर 28 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत, त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अपघाताची माहिती मिळताच तातडीनं बचाव पथक घटनास्थळी दाखल झालं, जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. हा अपघात नेमका कसा झाला? बस नदीत कशी कोसळली? याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही, मात्र भरधाव वाहनावरील चालकाचं नियंत्रण सुटून हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. मृतांमध्ये एका न्यूझीलंडच्या तर एका ब्रिटिश नागरिकाचा समावेश असल्याची माहिती समोर येत आहे.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, हा अपघात नेपाळमधील धाडिंग जिल्ह्यातल्या गजुरी परिसरात झाला आहे. रविवारी रात्री उशिरा एक प्रवासी बस त्रिशूली नदीमध्ये कोसळली, या घटनेत आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. या अपघाताबद्दल माहिती देताना नेपाळच्या सशस्त्र पोलीस दलाचे प्रवक्ता बिष्णू प्रसाद भट्ट यांनी सांगितलं की, ही बस पोखरावरून काठमांडूला जात होती. रात्री अंदाजे दीड वाजेच्या सुमारास काठमांडूपासून 90 किलोमीटर अंतरावर पृथ्वी राष्ट्रीय महामार्गावर ही बस त्रिशूली नदीमध्ये कोसळली. घटनास्थळावर आम्हाला आतापर्यंत 17 मृतदेह सापडले आहेत. तर या घटनेत 28 जण गंभीर जखमी आहेत, त्यांना उपचारासाठी वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मृतांमध्ये एक ब्रिटिश तर एका न्यूझीलंडच्या नागरिकाचा देखील समावेश आहे. घटनास्थळी बचाव कार्य सुरू आहे, बसमध्ये असलेल्या प्रवाशांचा शोध घेतला जात आहे. बसचा अपघात नेमका अपघात कसा झाला याची माहिती समोर आलेली नाही, मात्र भरधाव वेगामुळे वाहनावरून नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाला असावा असा अंदाज आहे, असं भट्ट यांनी म्हटलं आहे.

9 जणांची ओळख पटली

दरम्यान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या अपघातामधील 9 जणांची ओळख पटवण्यात यश आलं आहे. जे लोक या अपघातामध्ये जखमी झाले आहेत, त्यामध्ये एका चीनी नागरिकाचा देखील समावेश आहे, जखमी लोकांवर वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत, दरम्यान अजूनही काही नागरिक बेपत्ता असल्याची माहिती समोर येत आहेत.

Follow Us
अंतरावली सराटीतून मनोज जरांगेंचं मोठं विधान, केलं आवाहान...
Manoj Jarange Patil : अंतरावली सराटीतून मनोज जरांगेंचं मोठं विधान, प्रत्येक मराठ्याला केलं आवाहन
राष्ट्रीवादीत मोठ्या हालचाली? कोअर कमितटीच्या बैठीकत रोहित पवारांची...
राष्ट्रीवादीत मोठ्या हालचाली? कोअर कमितटीच्या बैठीकत रोहित पवारांची अनुपस्थिती, बड्या नेत्याने थेट...
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यावर; नेमकं कारणही आलं समोर
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यावर; नेमकं कारणही आलं समोर
हनुमंताचे दर्शन घेऊन जरांगे पाटलांनी सुरू केले उपोषण; मागण्या न मान्य
हनुमंताचे दर्शन घेऊन जरांगे पाटलांनी सुरू केले उपोषण; मागण्या न मान्य झाल्यास...
कुंभमेळ्यातील भ्रष्टाचारावर साधूसंतही नाराज; राऊतांची सरकारवर टीका...
Sanjay Raut | कुंभमेळ्यातील भ्रष्टाचारावर साधूसंतही नाराज; राऊतांची सरकारवर सडकून टीका
मनोज जरांगे पाटलांचं आजपासून अंतरवाली सराटीत आमरण उपोषण; राजकीय...
मनोज जरांगे पाटलांचं आजपासून अंतरवाली सराटीत आमरण उपोषण; राजकीय घडामोडींना वेग
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटलांचे निर्णायक उपोषण. सरकारला थेट इशारा
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटलांचे निर्णायक उपोषण. सरकारला दिला थेट इशारा
NTA मध्ये मोठा फेरबदल, IPS रवी कुमार सिंह यांची NTA संचालकपदी नियुक्ती
NTA मध्ये मोठा फेरबदल: आयपीएस रवी कुमार सिंह यांच्यासह तीन नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती
'हिम्मत असेल तर पोलीस संरक्षणाशिवाय फिरा'- गंगाधर काळकुटे
Gangadhar Kalkute on Gunratna Sadavarte : काळकुटेंचं सदावर्तेंना आव्हान, 'हिंमत असेल तर पोलीस संरक्षणाशिवाय फिरा'
राजीनामा द्या, आदिवासी आंदोलक अन् अशोक उईकेंमध्ये खडाजंगी
नाशिकमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांचा मंत्री अशोक उईकेंविरोधात एल्गार: राजीनाम्याची मागणी