AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Apple iPhone: पहिल्या फोल्डेबल आयफोनसह अजून एक मोठं सरप्राईज, ॲपलचा मोठा धमाका!

Apple सप्टेंबर महिन्यात iPhone 18 Pro सीरीजसह युझर्ससाठी खास फीचर्स असलेले इतर उत्पादनं बाजारात आणत आहे. त्यात सर्वाधिक आकर्षण आहे ते फोल्डेबल आयफोनचे, काही उत्पादनं सप्टेंबर तर उर्वरीत ऑक्टोबर महिन्यात बाजारात येतील.

Apple iPhone: पहिल्या फोल्डेबल आयफोनसह अजून एक मोठं सरप्राईज, ॲपलचा मोठा धमाका!
ॲपलचा मोठा धमाका! Image Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Aug 29, 2026 | 1:19 PM
Share

Apple सप्टेंबरमध्ये धमाका करणार आहे. iPhone 18 Pro सीरीजसह इतर अनेक उत्पादनं बाजारात उतरवणार आहे. याविषयीच्या वृत्तानुसार, कंपनीचा पुढील लाँच इव्हेंट 9 सप्टेंबर 2026 रोजी होऊ शकतो. या इव्हेंटमध्ये iPhone 18 Pro सीरीजसह कंपनीचा पहिल्या फोल्डेबल iPhone सह इतर उत्पादनं असतील. यामध्ये फोल्डेबल iPhone Ultra, Apple Watch Series 12, Watch Ultra 4 आणि नवीन AirPods चा समावेश आहे. काही डिव्हाईस हे ऑक्टोबर महिन्यात लाँच होतील.

iPhone 18 Pro आणि Pro Max मध्ये काय अंतर?

Apple च्या आगामी iPhone 18 Pro आणि iPhone 18 Pro Max लाँच इव्हेंट हा सर्वात चर्चेचा विषय ठरला आहे. हे दोन्ही फोनमध्ये कंपनीची नवीन A20 Pro चिप मिळण्याची अपेक्षा आहे. याशिवाय Dynamic Island हा पूर्वीपेक्षा आकाराने छोटा असेल. फोनच्या कॅमेरा कंट्रोल बटन अधिक सक्षमपणे देण्यात येईल. तर नवीन मॉडेलमध्ये Dark Cherry हा रंगाचा पर्याय देण्यात येऊ शकतो. iPhone 18 Pro Max मध्ये बॅटरी मोठी असेल. डिझाईन सुद्धा मोठी असेल. वृत्तानुसार, व्हेरिएबल अपर्चर कॅमेरा केवळ Pro Max मॉडलपर्यंत बराच बदल दिसू शकतो.

फोल्डेबल iPhone Ultra वर खिळली नजर

Apple पहिल्यांदाच फोल्डेबल स्मार्टफोन बाजारात उतरवू शकते. कंपनीच्या या प्रीमियम डिव्हाईसला iPhone Ultra नाव देण्याची चर्चा आहे. वृत्तानुसार, यामध्ये बाहेरील बाजूने 5.3 इंचाची स्क्रीन तर फोन उघडताच ही स्क्रीन 7.7 इंचाच्या इंटरनल डिस्प्लेमध्ये दिसेल.फोल्डेबल iPhone मध्ये दोन रिअर कॅमेरा आणि एक फ्रंट कॅमेरा असू शकतो. यामध्ये Face ID ऐवजी Touch ID चा वापर केला जाऊ शकतो. Apple फोल्डेबल फोनसाठी iOS 27 मध्ये एक खास फीचर्स असेल. यामुळे एकाच वेळी फोनमध्ये दोन ॲप चालू असतील.

Apple Watch Series 12 पण होणार लाँच

Apple Watch Series 12 पण या इव्हेंटमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. यामध्ये नवीन S11 चिप, मोठी बॅटरी आणि फिटनेस ट्रॅकिंग फीचर्स मिळू शकतात. कंपनी प्रीमियम लूकसह Ceramic केसचा पर्याय उपलब्ध करून देऊ शकते. याशिवाय Apple Watch Ultra 4 ची पण चर्चा होत आहे. यामध्ये हायटेक सुविधा, फिटनेस आणि सॅटेलाईटसारख्या अनेक फीचर्स मिळतील. सॅटेलाईट मॅप्स आणि Messages द्वारे फोटो पाठवण्याचे फीचर्स सुद्धा असू शकते.

AirPods 5 ची दोन मॉडेल येण्याची शक्यता

Apple एंट्री लेव्हल AirPods अपडेट करू शकते. माहितीनुसार, AirPods 5 चे दोन व्हेरिएंट सादर केले जाऊ शकतात. यामधील एका मॉडेलमध्ये Active Noise Cancellation (ANC) मिळेल. तर दुसरे मॉडेल हे कमी किंमतीचे असू शकते.

Follow Us
अंतरावली सराटीतून मनोज जरांगेंचं मोठं विधान, केलं आवाहान...
Manoj Jarange Patil : अंतरावली सराटीतून मनोज जरांगेंचं मोठं विधान, प्रत्येक मराठ्याला केलं आवाहन
राष्ट्रीवादीत मोठ्या हालचाली? कोअर कमितटीच्या बैठीकत रोहित पवारांची...
राष्ट्रीवादीत मोठ्या हालचाली? कोअर कमितटीच्या बैठीकत रोहित पवारांची अनुपस्थिती, बड्या नेत्याने थेट...
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यावर; नेमकं कारणही आलं समोर
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यावर; नेमकं कारणही आलं समोर
हनुमंताचे दर्शन घेऊन जरांगे पाटलांनी सुरू केले उपोषण; मागण्या न मान्य
हनुमंताचे दर्शन घेऊन जरांगे पाटलांनी सुरू केले उपोषण; मागण्या न मान्य झाल्यास...
कुंभमेळ्यातील भ्रष्टाचारावर साधूसंतही नाराज; राऊतांची सरकारवर टीका...
Sanjay Raut | कुंभमेळ्यातील भ्रष्टाचारावर साधूसंतही नाराज; राऊतांची सरकारवर सडकून टीका
मनोज जरांगे पाटलांचं आजपासून अंतरवाली सराटीत आमरण उपोषण; राजकीय...
मनोज जरांगे पाटलांचं आजपासून अंतरवाली सराटीत आमरण उपोषण; राजकीय घडामोडींना वेग
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटलांचे निर्णायक उपोषण. सरकारला थेट इशारा
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटलांचे निर्णायक उपोषण. सरकारला दिला थेट इशारा
NTA मध्ये मोठा फेरबदल, IPS रवी कुमार सिंह यांची NTA संचालकपदी नियुक्ती
NTA मध्ये मोठा फेरबदल: आयपीएस रवी कुमार सिंह यांच्यासह तीन नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती
'हिम्मत असेल तर पोलीस संरक्षणाशिवाय फिरा'- गंगाधर काळकुटे
Gangadhar Kalkute on Gunratna Sadavarte : काळकुटेंचं सदावर्तेंना आव्हान, 'हिंमत असेल तर पोलीस संरक्षणाशिवाय फिरा'
राजीनामा द्या, आदिवासी आंदोलक अन् अशोक उईकेंमध्ये खडाजंगी
नाशिकमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांचा मंत्री अशोक उईकेंविरोधात एल्गार: राजीनाम्याची मागणी