AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Solapur ZP Election: राज्यात एकमेकांविरोधात कुरघोडी, भाजपला शह देण्यासाठी सोलापूरात दोन्ही शिवसेनेची दिलजमाई!

Solapur ZP Election: स्थानिक राजकीय पुढाऱ्यांनी सर्वच पक्षांची गोळाबेरीज करून टाकली आहे. त्यामुळे नेत्यांचाही नाईलाज झाल्याचे दिसून येते. कुठं एमआयएम-भाजपचं सूत जुळलंय तर कुठं काँग्रेस-भाजप एकत्र आली आहे, आता या यादीत दोन शिवसेनेच्या युतीचाही प्रयोग होऊ घातला आहे.

Solapur ZP Election: राज्यात एकमेकांविरोधात कुरघोडी, भाजपला शह देण्यासाठी सोलापूरात दोन्ही शिवसेनेची दिलजमाई!
दोन्ही शिवसेना एकत्र, सोलापूर जिल्हा परिषदImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Edited By: | Updated on: Jan 24, 2026 | 10:15 AM
Share

Shivsena Alliance against BJP: स्थानिक राजकीय पुढाऱ्यांनी सर्वच राजकीय पक्षांच्या राजकीय द्वेषाला आणि धोरणांना वेशीवर टांगले आहे. कोणत्या पक्षाचं सूत कोणत्या पक्षासोबत जुळलं हेच कळत नाही. कुठं एमआयएम-भाजपचे सूर जुळालेत. तर कुठं भाजप-काँग्रेस आघाडीची दवंडी देण्यात आली. आता दोन्ही शिवसेनेची दिलजमाई झाल्याचे दिसून येत आहे. सोलापूर जिल्हा परिषद निवडणुकीत हे दोन्ही पक्ष एकत्र आले आहेत. विशेष म्हणजे त्यांनी भाजपविरोधात शड्डू ठोकले आहे. भाजपला मिनी मंत्रालयातील सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी हा प्रयोग करण्यात येत आहे हे विशेष.

झेडपी निवडणुकीसाठी दोन्ही शिवसेना एकत्र

सोलापूरात जिल्हा परिषद निवडणुकीसाठी दोन्ही शिवसेना एकत्र येत आहे. बार्शी तालुक्यात जिल्हा परिषद निवडणुकीत दोन्ही शिवसेनेची महाआघाडी आहे. विशेष म्हणजे भाजपविरोधात दोन्ही शिवसेना, दोन्ही राष्ट्रवादी मिळून महाआघाडी स्थापन करण्यात आली आहे. ठाकरे गटाचे आमदार दिलीप सोपल यांनी याबाबत सोशल मीडियावर पोस्ट करत मेळाव्याला येण्याचे आवाहन केले आहे. या महाआघाडीमुळे सोलापूरच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे आमदार दिलीप सोपल विरुद्ध भाजपचे माजी आमदार राजेंद्र राऊतांच्या नेतृत्वात या निवडणुका लढल्या जाणार आहेत. एकीकडे संजय राऊत यांनी शिवसेना शिंदे गटासोबत कदापी जाणार नाही अशी भूमिका घेतलेली असताना दुसरीकडे दोन्ही शिवसेना एकत्रित निवडणूक लढत आहेत. त्यामुळे स्थानिक पातळीवरचं राजकारण वेगळं असतं हे समोर आले आहे.

संजय राऊत यांची तीव्र नाराजी

तर सोलापूरात दोन्ही शिवसेना एकत्र आल्याची माझ्याकडे कोणती माहिती नाही. दोन्ही शिवसेना एकत्र आल्याची अधिकृत माहिती आलेली नाही. तसेच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची ही अधिकृत भूमिका नाही अशी खणखणीत प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी दिली. शिंदे सेनेसोबत आमच्या भावना तीव्र आहेत. तर सोलापूरातील घाडमोड माहिती नसली तरी त्याविषयीची माहिती लवकरच घेणार असल्याचेही राऊत यांनी स्पष्ट केले. सोलापूरातील स्थानिक घाडमोडींबाबत वरिष्ठ नाराज असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे ही आघाडी किती दिवस टिकते याकडेही सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

भाजपच्या गटनेत्याची आज निवड

सोलापूर महापालिकेसाठी आज भाजपच्या गटनेत्याची आज निवड केली जाणार आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत गटनेता निवडीबाबत बैठक होणार आहे. गटनेते तसेच महापौर पदासाठी भाजपचे विनायक कोंड्याल, अनंत जाधव, डॉ. किरण देशमुख आणि नरेंद्र काळे यांची नावे चर्चेत आहेत. आज पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत पक्षाने नूतन नगरसेवकांची तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीत पक्षाच्या गटनेत्याची निवड करण्यात येणार आहे. भाजपने अद्याप कोणतीही भूमिका जाहीर न केल्याने ऐनवेळी कोणाचे नाव समोर येते याकडे सर्वांचे लक्ष

कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले...
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा.....
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे.
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट.
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण...
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण....
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला.
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?.
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?.
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या...
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या....
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?.