तर मग चीन तुम्हाला खाऊन टाकेल… अत्यंत मोठा इशारा, जग हादरलं, शेजारी देश…
डोनाल्ड ट्रम्प मागील काही दिवसांपासून घेत असलेल्या निर्णयामुळे जगाचे गणित पूर्णपणे बदलले आहे. एकमेकांचे खास मित्र असलेले देश आज शत्रू झाले आहेत. समीकरणे झपाट्याने बदलताना दिसत आहेत. भारत आणि चीन देखील अनेक वर्षांनंतर जवळ आले आहेत.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निशाण्यावर आता कॅनडा आहे. कॅनडाच्या पंतप्रधानांनी टॅरिफ आणि महाशक्तींविरोधात थेट भाषण केल्याने डोनाल्ड ट्रम्प यांचा नुसता थयथयाट बघायला मिळत आहे. अमेरिकेच्या गोल्डन डोम क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालीचा हवाला देत. ट्रम्प यांनी ही प्रणाली ग्रीनलँडमध्ये तैनात करण्याचा प्लॅन तयार केला. मात्र, यादरम्यानच त्यांनी असाही दावा केला की, कॅनडाचेही या माध्यमातून संरक्षण केले जाईल. पण याकरिता कॅनडासह युरोपने अमेरिकेला जोरदार विरोध केला. ट्रम्प यांनी आरोप केला आहे की, कॅनडा अमेरिकेच्या सुरक्षा व्यवस्थेला पाठिंबा देण्याऐवजी चीनशी संबंध विकसित करत आहे. कॅनडा आणि चीन यांच्यातील जवळीकता नक्कीच डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी डोकेदुखी ठरत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. यामध्येच अमेरिकेच्या विरोधात कॅनडा थेट भूमिका देखील घेत आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठा इशारा कॅनडाला देत थेट म्हटले की, कॅनडा जर चीनच्या जवळ गेला तर एका वर्षाच्या आतमध्ये चीन हा कॅनडाला खाऊन टाकेल. आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या या विधानाने मोठी खळबळ उडाली. डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत स्पष्ट शब्दात म्हटले की, गोल्डन डोम कॅनडाचे देखील संरक्षण करेल. कॅनडा चीनसोबत व्यापार करार करत मोठे निर्णय घेत आहे.
मुळात म्हणजे चीन कॅनडासाठी धोका निर्माण करू शकतो. सध्या अमेरिका आणि कॅनडा यांच्यातील संबंध तणावात असल्याचे बघायला मिळत आहे. कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी दावोस येथील 56 व्या जागतिक आर्थिक मंचात केलेल्या वक्तव्यामुळे ते आणखी खराब झाले. थेट अमेरिकेला टोला मारताना मार्क दिसले.
मार्क कार्नी यांचे विधान ऐकून डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट निशाना साधत म्हटले की, आतार्यंत कॅनडा जो काही सुरक्षित आहे तो फक्त आणि फक्त अमेरिकेमुळेच तर मार्क यांनी अमेरिकेच्या विरोधात पुढच्यावेळी काही विधान करण्याच्या आत या गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक आहे. त्यामध्येच कॅनडाला चीनकडून मोठा धोका असल्याचेही त्यांनी स्पष्ट शब्दात म्हटले.
