भारत आणि रशियाचा डोनाल्ड ट्रम्प यांना सर्वात मोठा दणका, जगात खळबळ, अमेरिकेच्या हातावर तुरी देत थेट…
डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे गेल्या काही दिवसांपासून भारत आणि रशियातील संबंध एका वेगळ्या वळणावर आहेत. दोन्ही देशांना एकमेकांसोबत व्यापार करायचा आहे. मात्र, भारतावर अमेरिकेने अनेक मोठे निर्बंध लादली आहेत. आता अमेरिकेची झोप उडवणारी बातमी आली आहे.

भारत आणि रशियात गेल्या अनेक दिवसांपासून चांगले संबंध आहेत. भारताच्या वाईट काळात रशिया प्रत्येकवेळी भारतासोबत होता. आता भारतानेही तेच केले. रशिया आणि युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचा रशियावर प्रचंड दबाव असून कोणत्याही परिस्थितीमध्ये रशियाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न अमेरिकेकडून केला जात आहे. भारतावर गंभीर आरोप करत डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, भारत रशियाकडून कच्चे तेल खरेदी करत असल्याने रशिया युक्रेन युद्ध सुरू आहे. सुरूवातीला डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून भारताला रशियाकडून तेल खरेदी न करण्यासाठी धमक्या दिल्या. भारताने या धमक्यांना कोणत्याही प्रकारची भीक घातली नसल्याने थेट भारतावर 50 टक्के टॅरिफ लावण्याचा मोठा निर्णय अमेरिकेने घेतला. यादरम्यान भारतातून अमेरिकेत होणारी निर्यात कमी झाली. रशियानेही त्यांच्या बाजारपेठेत भारतीय वस्तूंचे मोठ्या प्रमाणात स्वागत केले. अमेरिकेच्या 50 टक्के टॅरिफनंतरही भारतीय अर्थव्यवस्थेवर कोणताच परिणाम झाला नाही.
त्यामध्येच अमेरिकेकडून आता नुकताच मोठा दावा करण्यात आला. काही दिवसांपूर्वी भारताने रशियाकडून पूर्णपणे तेल खरेदी बंद केली नाही तर 500 टक्के टॅरिफ लावला जाईल, अशी धमकी देण्यात आली. त्त्यानंतर अमेरिकेने स्पष्ट शब्दात आकडे दाखवत सांगितले की, भारताने ज्यावेळी रशियाकडून तेल खरेदी कमी केली, त्यावेळी आम्ही त्यांच्यावर 50 टक्के टॅरिफ लावला. आता 500 टक्के टॅरिफ लावणार होतो. मात्र, त्यांनी भारताकडून तेल खरेदी अमेरिकेच्या दबावामुळे पूर्णपणे बंद केली.
आम्ही रशियाला आता भारतापासून दूर केले. अमेरिकेच्या या दाव्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. आता अमेरिकेची झोप उडवणारी आकडेवारी पुढे येताना दिसत आहे. अमेरिकेच्या निर्बंधांनंतर रशियाकडून भारतात येणाऱ्या तेलाने नवा मार्ग शोधला आहे. रशियाकडून भारतात येणारा तेलाचा हिस्सा आता छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांकडून येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या 15 दिवसात भारतात ज्या कंपन्यांचे तेल जहाजाने आले. त्याची नावे अल्गफ मरीन, स्लावियांस्क ईसीओ, विस्टुला डेल्टा, रेडवूड ग्लोबल सप्लाय, एथोस एनर्जी ही आहेत.
या कंपन्यांच्या व्यापाऱ्यांनी भारतात किमान दोन वर्षांपूर्वी तरी कधी कच्चे तेल पाठवले नव्हते. गेल्या 15 दिवसांमध्ये यांच्याकडून तेल भारताच निर्यात केले जात आहे. या काही रशियान छोट्या कंपन्या आहेत तर काही संयुक्त अरब संबंधित आहेत. यामुळे भारताने आणि रशियाने अमेरिकेच्या हातावर तुरी देत भारतात कच्चे तेल पाठवण्याचा नवा मार्ग शोधला आहे.
