AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

माझ्यासाठी कठीण काळ होता..! अखेर गौतम गंभीरने दु:ख सांगितलं

गौतम गंभीर प्रशिक्षकपदी रूजू झाल्यानंतर भारतीय संघाने वनडे आणि टी20 क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली. पण कसोटी क्रिकेटमध्ये टीम इंडियाची पुरती वाट लागली. आता भारताने टी20 वर्ल्डकप जिंकला असून गौतम गंभीरने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

माझ्यासाठी कठीण काळ होता..! अखेर गौतम गंभीरने दु:ख सांगितलं
माझ्यासाठी कठीण काळ होता..! पण एक व्यक्ती सोडून कोणीच फोन केला नाही, गौतम गंभीरने दु:ख सांगितलंImage Credit source: PTI
| Updated on: Mar 11, 2026 | 10:59 PM
Share

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत भारताने देदिप्यमान कामगिरी करत जेतेपदाला गवसणी घातली. या संपूर्ण स्पर्धेत एक सामना सोडला तर चांगली कामगिरी झाली. भारताने अंतिम फेरीत न्यूझीलंडचा 96 धावांनी पराभव केला आणि तिसऱ्यांदा जेतेपद मिळवलं. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेत यश मिळाल्यानंतर प्रशिक्षक गौतम गंभीर टी20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी रणनिती आखण्यास गुंतला होता. त्याच्या रणनितीमुळे भारताला पुन्हा एकदा जेतेपदाचं स्वप्न पूर्ण करता आलं. या विजयानंतर गौतम गंभीरने आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली आहे. कसोटी क्रिकेटमधील पराभवानंतर खचल्याचं सांगितलं. त्यावेळेस एक व्यक्ती पाठीशी उभी होती असं गौतम गंभीरने सांगितलं. ती व्यक्ती म्हणजे आयसीसी अध्यक्ष जय शाह.. टीम इंडियाच्या विजयानंतर एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना गौतम गंभीर म्हणाला की, “न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या घरच्या कसोटी मालिकेत टीम इंडियाचा पराभव हा माझ्या कारकिर्दीतील सर्वात वाईट क्षण होता.”

गौतम गंभीरच्या प्रशिक्षकपदाच्या कारकिर्दीत टीम इंडियाचा घरच्या मैदानावर दोन कसोटी मालिकांमध्ये व्हाईट वॉश मिळाला. यानंतर गौतम गंभीर निराश झाला होता. त्याने सांगितलं की, घरच्या मैदानावर झालेल्या दोन्ही पराभवांना मी कधीही विसरणार नाही. या अपमानास्पद पराभवानंतर कोणीही मला फोन केला नाही. पण जय शाह हा एकमेव व्यक्ती होते की ज्यांनी मला फोन करून सांत्वन केलं. जय शाह म्हणाले की, म्हणाला, “हिंमत धर, आम्ही तुझ्यासोबत आहोत.”

गौतम गंभीर म्हणाला की, आम्ही दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिका हरलो, तेव्हा जय शाह यांनी पुन्हा आमचं फोन करून सांत्वन दिले. आपला पूर्ण पाठिंबा दर्शवला आणि आम्हाला नवीन उत्साह दिला. हे मी नेहमीच लक्षात ठेवेन. जय शाह यांच्या पाठिंब्यामुळेच मी आज टी20 विश्वचषक जिंकलो किंवा प्रशिक्षक म्हणून काम करत राहिलो. इतकेच नाही तर त्यांच्यामुळेच मी टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षकपद स्वीकारले, असंही सांगण्यास गौतम गंभीर विसरला नाही. दक्षिण अफ्रिकेविरूद्ध कसोटी मालिका गमावल्याने भारताचं वर्ल्ड टेस्ट 2027 स्पर्धेच्या अंतिम फेरीचं स्वप्न पूर्ण होईल की नाही हे सांगणं कठीण आहे.

Follow Us
सह्याद्रीवर धुक्याची चादर, दऱ्याखोऱ्यात धबधबे; ‘मिसिंग लिंक’चं हे...
सह्याद्रीवर धुक्याची चादर, दऱ्याखोऱ्यात धबधबे; ‘मिसिंग लिंक’चं हे दृश्य पाहाच!
संजय राऊतांवर अमृता फडणवीस संतापल्या, थेट म्हणाल्या राऊतांसारखं....
संजय राऊतांवर अमृता फडणवीस संतापल्या, थेट म्हणाल्या राऊतांसारखं बरळण्यापेक्षा...
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया...
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया समोर, एका वाक्यातच...
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ Delete केल्याप्रकरणी
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ Delete केल्याप्रकरणी अखेर Metaने मागितली माफी, पहा व्हिडीओ
वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या ट्वीटने खळ
Walmik Karad | वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या ट्वीटने खळबळ
शिवसेना कुणाची? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; शिंदे गट अडचणीत?
शिवसेना कुणाची? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; शिंदे गट अडचणीत? सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरणार?; सुनावणीनंतर राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut On SC Hearing | शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरणार?; सुनावणीनंतर संजय राऊतांचा मोठा दावा
शिवसेना कुणाची? जोरदार युक्तावादनंतर आजची सुनावणी संपली, कोर्टात...
शिवसेना कुणाची? जोरदार युक्तावादनंतर आजची सुनावणी संपली, कोर्टात नेमकं काय घडलं?
कुणबी प्रमाणपत्र अवैध, मराठा समाजाच्या... छत्रपती संभाजीनगरातून...
Kunbi Certficate | कुणबी प्रमाणपत्र अवैध, मराठा समाजाच्या... छत्रपती संभाजीनगरातून मोठी अपडेट समोर!