Kishori Pednekar | राज ठाकरेंच्या ट्वीटवर किशोरी पेडणेकर यांचे भाष्य, म्हणाल्या; राजकारणात लवचिकता नक्की असावी पण…
‘आरपार बदललेल्या राजकारणामध्ये कधीतरी लवचिक भूमिका घेतली तरी ती माझ्या व्यक्तिगत फायद्यासाठी आणि स्वार्थासाठी कधीही नसेल,’ असं सूचक ट्विट राज ठाकरेंनी केलं, यावर ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
राज ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 100व्या जयंतीनिमित्ताने ट्विट करून भाष्य केलं होतं. भाष्य करताना राज ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या राजकारणाचे दाखलेही दिले. ‘आरपार बदललेल्या राजकारणामध्ये कधीतरी लवचिक भूमिका घेतली तरी ती माझ्या व्यक्तिगत फायद्यासाठी आणि स्वार्थासाठी कधीही नसेल,’ असं सूचक ट्विट राज ठाकरेंनी केलं, ‘आज निष्ठा सहज विकल्या जातात, तत्त्व सहज फेकली जातात आणि राजकारण हे पूर्णपणे व्यवहारी झालंय’ असंही ठाकरे म्हणाले होते.
यावर ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली, राज ठाकरेंच्या निर्णयावर मी बोलणार नाही परंतु, राजकारणात लवचिकता नक्की असावी पण त्या लवचिकतेमध्ये काही तुटणार नाही याची काळजी जरूर असावी.

