शिवसेनेतून बंडखोरी झाली ही गोष्ट वाईट असली तरी, शिवसेनेतील काही वरिष्ठ नेत्यांनीही आमदारांकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे सेनेतील आमदार नाराज होते. त्याबद्दल बोलताना सांगितले की, पक्ष नेतृत्वाने वेळीच लक्ष दिले नसल्याने शिवसेनेवर ही वेळ आली आहे अशी टीका त्यांनी शिवसेनेवरच केली आहे.
कोणत्याही विचारधारेशी बांधिलकी न ठेवता हे अनैसर्गिक सरकार आले आहे, त्याचीच फळे या महाराष्ट्रात आलेली दिसत आहेत. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर... या अर्थाने ईश्वराचीच काठी या सरकारला बसली की काय, असे गजानन काळे म्हणाले.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांच्या प्रतिमा जाळून अग्निपथ योजनेच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली.
राष्ट्रवादीला मला रोखता येत नाही त्यामुळे बदनाम करण्याचं षडयंत्र आखलं जात असल्याचा आरोप सदाभाऊंनी केला. आता संबंधित हॉटेल मालक अशोक शिनगारे यांनी एक रजिस्टर दाखवत सदाभाऊ खोत यांच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या जेवणाचं बिल दाखवलंय.
अक्कलकोट तालुक्यातील चपळगावमध्ये बचत गटाच्या महिलांकडून हॉटेल चालवलं जातं. त्यावेळी तिथे एक आजी वडे तळत होत्या. त्यांना पाहून महादेव जानकर यांनी त्यांच्या हातातील झाऱ्या घेऊन बटाटे वडे तळण्याचा प्रयत्न केला.
आता सदाभाऊंचा अजून एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यात सदाभाऊ एका थ्री स्टार हॉटेलमध्ये (Three Star Hotel) कार्यकर्त्याच्या शिदोरीवर ताव हाणताना दिसत आहेत.
Sadabhau Khot: अशा प्रकारची षडयंत्रे रचून सदाभाऊंचा आवाज दाबला जाऊ शकणार नाही हे राष्ट्रवादीच्या नेत्यांना माहीत आहे. मी या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला नाही. पोलिसांवर दबाव होता का? त्याची देखील चौकशी झाली पाहिजे.
दिवसेंदिवस नुपुर शर्मा प्रकरण अधिक तापत असल्याचं पाहायला मिळत आहे. कारण सोलापुरात एका तरुणाला नुपुर शर्माच्या समर्थनात स्टेटस ठेवल्यामुळे बेदम मारहाण करण्यात आलीय. मारहाणीचा हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय.