AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दादा आपल्यातच… निरा-कऱ्हेच्या संगमासह विद्या प्रतिष्ठानमधील झाडांमध्ये विसावणार दादांच्या अस्थी

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने राज्यभर शोककळा पसरली आहे. अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर सर्वांनाच धक्का बसला. अजित पवार आज आपल्यात नाहीत याचा विचारही कोणी करू शकत नाही.

दादा आपल्यातच... निरा-कऱ्हेच्या संगमासह विद्या प्रतिष्ठानमधील झाडांमध्ये विसावणार दादांच्या अस्थी
Ajit Pawar
| Edited By: | Updated on: Jan 30, 2026 | 11:28 AM
Share

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने मोठी खळबळ उडाली. 28 जानेवारी 2026 रोजी अजित पवार सकाळी 8.10 ला विमानाने मुंबईहून बारामतीकडे निघाले होते. बारामतीमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी त्यांच्या 4 सभा होत्या. मात्र, 8.45 ला अजित पवार यांच्या विमानाचा बारामती विमानतळाच्या धावपट्टी शेजारी मोठा अपघात झाला. या अपघातात अजित पवार यांच्यासह 5 जणांचा मृत्यू झाला. सरकारकडून या अपघात प्रकरणात सीआयडीची स्थापना करण्यात आली. केंद्र शासनाकडूनही अपघाताचा तपास केला जातोय. अजित पवार यांच्या विमानाचा अपघात होण्यापूर्वीची काही व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्हिडीओमध्ये स्पष्टपणे विमान एका बाजूला झुकल्याचे दिसत आहेत. विमान धावपट्टीच्या जवळच असलेल्या शेतात कोसळले. विमान ज्यावेळी कोसळले त्यावेळी अत्यंत मोठा आवाज झाला आणि थेट आग लागली. मोठ्या स्फोटानंतर तीन ते चार स्फोट झाल्याचा दावा स्थानिकांकडून केला जात आहे.

अजित पवार यांच्या निधनानंतर एक मोठी पोकळी राज्यात निर्माण झाली. पवार कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. यादरम्यानच आज अजित पवार यांचा तिसऱ्याचा विधी पार पडला आहे. अजित पवार यांच्या काही अस्थी नीरा-कऱ्हा नदीच्या संगमात सोडल्या आहेत तर उर्वरित अस्थी या विद्या प्रतिष्ठान परिसरातील झाडांच्या बुडात सोडणार असल्याचे पवार कुटुंबियांचे जवळचे व्यक्ती किरण गुजर यांनी सांगितले.

पुढे त्यांनी म्हटले की, पवार कुटुंब आणि आम्ही सर्वजण अजूनही दुःखात आहोत. त्यामुळे अद्याप राष्ट्रवादी पक्ष एकत्र येण्याबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. पवार कुटुंबात कोणतीही पक्ष एकत्रिकरणाबाबत चर्चा झाली नाही. सुनेत्रा ताईंना उपमुख्यमंत्री करण्याबाबत पक्षातील लोकं निर्णय घेईल. सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करण्यात यावे, अशी मागणी केली जात आहे. मात्र, त्यावर पवार कुटुंबात चर्चा झाली नसल्याचे स्पष्ट आहे.

काल बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात अजित पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले. यावेळी राज्यभरातून लोक बारामतीत दाखल झाले. बारामतीत शोककळा बघायला मिळाली. यादरम्यान पूर्ण पवार कुटुंब एकत्र होते. आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? आणि उपमुख्यमंत्री नक्की कोण होणार? यावर विविध चर्चा या रंगताना दिसत आहेत.

दादांच्या उत्तराधिकारी सुनेत्रा पवारच?उपमुख्यमंत्रीपदासाठी नाव आघाडीवर
दादांच्या उत्तराधिकारी सुनेत्रा पवारच?उपमुख्यमंत्रीपदासाठी नाव आघाडीवर.
अवकाळी पावसाचा थयथयाट... वारा एवढा सुटला की पपईची गाडीच उलटली
अवकाळी पावसाचा थयथयाट... वारा एवढा सुटला की पपईची गाडीच उलटली.
विलीनीकरण करुन अजित पवार यांची इच्छा पूर्ण करणार?
विलीनीकरण करुन अजित पवार यांची इच्छा पूर्ण करणार?.
विरोधकांना विरोधी पक्षनेतेपद मिळू नये म्हणून सरकारचा डाव?
विरोधकांना विरोधी पक्षनेतेपद मिळू नये म्हणून सरकारचा डाव?.
शेवटच्याक्षणी पायलटने प्रतिसाद का दिला नाही? विमानात नेमकं काय घडलं?
शेवटच्याक्षणी पायलटने प्रतिसाद का दिला नाही? विमानात नेमकं काय घडलं?.
पवार घराण्यातून नेतृत्व कुणाकडे? राजकीय वारसा कोण चालवणार?
पवार घराण्यातून नेतृत्व कुणाकडे? राजकीय वारसा कोण चालवणार?.
जीवश्य कंठश्य मित्र...; फडणवीसांनी लिहिला भावनिक लेख!
जीवश्य कंठश्य मित्र...; फडणवीसांनी लिहिला भावनिक लेख!.
आमचा तेजस्वी सूर्य अस्ताला गेला! रोहित पवारांचं भावनिक ट्विट
आमचा तेजस्वी सूर्य अस्ताला गेला! रोहित पवारांचं भावनिक ट्विट.
अजित पवारांच्या निधनानंतर राज्याचा अर्थसंकल्प कोण मांडणार?
अजित पवारांच्या निधनानंतर राज्याचा अर्थसंकल्प कोण मांडणार?.
यंदाच्या वर्षात सोन अडीच लाखांच्या घरात जाणार? काय आहेत सध्याचे दर?
यंदाच्या वर्षात सोन अडीच लाखांच्या घरात जाणार? काय आहेत सध्याचे दर?.