AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! वाल्मिक कराडचा जेलमध्ये अजब कांड, रोज दोन-अडीच तास…संतोष देशमुखांच्या भावाचा खळबळजनक दावा

सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी नुकताच माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी आरोपी वाल्मीक कराडला दिल्या जाणाऱ्या सुविधांचा खुलासा केला आहे.

मोठी बातमी! वाल्मिक कराडचा जेलमध्ये अजब कांड, रोज दोन-अडीच तास...संतोष देशमुखांच्या भावाचा खळबळजनक दावा
बीडImage Credit source: Tv9 Marathi
| Updated on: Aug 05, 2026 | 4:57 PM
Share

बीड जिल्ह्यातल्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची डिसेंबर 2024 रोजी हत्या करण्यात आली. पहिले संतोष देशमुख यांचे अपहरण करण्यात आले. त्यानंतर त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणामुळे संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली. त्यानंतर या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडला अटक करण्यात आली. तो सध्या बीड जिल्हा कारागृहात आहे. मात्र कारागृहात त्याला अनेक बेकायदेशीर सुविधा देण्यात आल्याचे संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी म्हटले आहे.

काय म्हणाले धनंजय देशमुख?

धनंजय देशमुख यांनी नुकताच माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, कारागृह निरीक्षक आणि मुख्यमंत्री यांना पत्र पाठवले आहे. मागच्या दीड वर्षात जो इतिहास आहे तो पाहिला, कारागृहात जेलर बदलले आहे. आरोप होत आहेत. जेलर यांना अंधारात ठेवले जात आहेत. प्रत्येक कैद्याचे सिमकार्ड वापरले जात आहे. दीड-दीड तास बोलणे होत आहे. याची चौकशी करून कारवाई झाली पाहिजे.

पुढे ते म्हणाले की, दीड वर्षापासून या गुन्हेगारांना हलवा अशी मागणी करत आहोत. इतर आरोपी दुसऱ्या तुरुंगात हलवले जात आहे. माझ्या भावाची हत्या केली गेली.. त्या विषयामध्ये आणि या विषयात तुलना नाही. खासदार पुत्र सौरव सोनवणे यांच्या बचावासाठी कुठे मोर्चे निघाले नाहीत. घुले आणि देशमुख हे प्रकरणे वेगळे आहेत. याची तुलना होऊ शकत नाही. एक आरोपी सुरुवातीला अर्ज देतो की मला लातूर कारागृह पाहिजे. नंतर म्हणतो बीड पाहिजे.

सुप्रिया सुळेंनी देखील केली होती पोस्ट

सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या अधिकृत एक्स अकाऊंटवर, ‘मस्साजोगचे सरपंच स्व. संतोष देशमुख यांच्या हत्येतील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याला बीड जिल्हा कारागृहात राजकीय प्रभावामुळे बेकायदेशीर सुविधा दिल्या जात असल्याचा गंभीर आरोप संतोष देशमुख यांचे बंधू श्री. धनंजय देशमुख यांनी कारागृह अधीक्षक यांना लिहिलेल्या पत्राद्वारे केला आहे. यामध्ये इतर कैद्यांच्या नावावरून आणि वकिलांच्या सिमकार्डद्वारे बाहेरील व्यक्तींशी संपर्क साधणे, दुपारच्या बंदीच्या काळात अधीक्षक कार्यालयात बसवून नियमबाह्य पद्धतीने व्हिडिओ कॉल सुविधा पुरविणे, बराक क्र. ९ जवळील फोनजवळ सीसीटीव्ही कॅमेरा नसणे आणि कारागृहातूनच बीडमधील परिस्थितीवर प्रभाव टाकून इतर आरोपींच्या मदतीने दहशत निर्माण करणे आदी मुद्दे नमूद आहेत. न्यायप्रक्रियेचा हा थेट अपमान असून माझी मुख्यमंत्र्यांना मागणी आहे की कृपया सदर आरोपीची बीड कारागृहातून नागपूर मध्यवर्ती कारागृहात रवानगी करावी. बीड कारागृहातील सीसीटीव्ही फुटेज, कॉल लॉग आणि भेट नोंदवही जप्त करून वरिष्ठ स्तरावर चौकशी व्हावी.आरोपीला मदत करणाऱ्या संबंधित कारागृह अधिकारी व कर्मचाऱ्यांवर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करावेत. पीडित देशमुख कुटुंबाला न्याय मिळणे याला आमचे प्राधान्य असून आम्ही यासाठी आग्रही आहोत’ अशी पोस्ट केली.

Follow Us
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?
मोठी बातमी! शिंदे गटाचं टेन्शन वाढलं? कोर्टाच्या निदर्शनात असं काय आलं
मोठी बातमी! शिंदे गटाचं टेन्शन वाढलं? कोर्टाच्या निदर्शनात असं काय आलं?
2018चे बदल आयोगाला कळवले, पोचपावतीही आहे; सिब्बलांचा कोर्टात दावा
Shivsena Supreme Court Hearing | 2018चे बदल आयोगाला कळवले, पोचपावतीही आहे; कपिल सिब्बलांचा कोर्टात मोठा दावा
शिवसेनेचं धनुष्यबाण नेमकं कुणाचं? कपिल सिब्बल यांचा नेमक्या मुद्यावर..
शिवसेनेचं धनुष्यबाण नेमकं कुणाचं? कपिल सिब्बल यांचा नेमक्या मुद्यावर युक्तीवाद; म्हणाले, आमच्याकडे आयोगाची पोचपावती...
अखेर भेटूही दिलं नाही अन्...पाकिस्तानचे माजी PM इमरान खान यांचा मृत्यू
अखेर भेटूही दिलं नाही अन्... पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांचा तुरूंगातच मृत्यू; काय घडलं?
CM फडणवीस आणि राज ठाकरे भेटीची इनसाईड स्टोरी; मनसे नेत्यानेच सांगितलं
CM फडणवीस आणि राज ठाकरे भेटीची इनसाईड स्टोरी; मनसे नेत्यानेच सांगितलं भेटीचं नेमकं कारण
भरत गोगावले यांच्या नावावर आज शिक्कामोर्तब होणार?
Bharat Gogawale | रायगडच्या पालकमंत्रिपदाचा सस्पेन्स संपणार; भरत गोगावले यांच्या नावावर आज शिक्कामोर्तब होणार?
शॉर्टकट'चा वापर करु नका', पंतप्रधान मोदींचा Gen-Z तरुणाईला संदेश
PM Modi : 'कधीही 'शॉर्टकट'चा वापर करु नका', पंतप्रधान मोदींचा Gen-Z तरुणाईला खास संदेश