AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पूर्णेकर प्रकरणात नवा ट्विस्ट! पोलिसांच्या मारहाणीचा आरोप, शरीरावर जखमांच्या खुणा; अर्जुनच्या मेडिकल रिपोर्टमध्ये काय-काय नोंदी?

Pradeep Purnekar Case Update: प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. पोलिसांवर आरोप करणाऱ्या अर्जुनच्या मेडिकल रिपोर्टमध्ये महत्त्वाच्या नोंदी समोर आल्या आहेत.

पूर्णेकर प्रकरणात नवा ट्विस्ट! पोलिसांच्या मारहाणीचा आरोप, शरीरावर जखमांच्या खुणा; अर्जुनच्या मेडिकल रिपोर्टमध्ये काय-काय नोंदी?
| Updated on: Oct 30, 2026 | 11:52 PM
Share

ठाण्यातील प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर आपल्याला अमानुष मारहाण केली तसेच लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करणाऱ्या अर्जुन या तरुणाचा वैद्यकीय तपासणी अहवाल TV9 मराठीच्या हाती लागला आहे. ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये अर्जुनची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. या तपासणीदरम्यान त्याच्या शरीरावर काही दुखापतींची नोंद करण्यात आली आहे.

वैद्यकीय नोंदीनुसार, अर्जुनच्या गळ्याच्या उजव्या बाजूला दुखापत झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच गुप्तांगाच्या भागात तीन जखमा आढळल्याची नोंदही अहवालात आहे. कापूरबावडी पोलिसांनी आपल्याला पट्टा आणि दांडक्याने मारहाण केल्याचा आरोप अर्जुनने केला होता. या आरोपांच्या पार्श्वभूमीवर त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. डॉक्टरांनी पुढील तपासणीसाठी अर्जुनचा एक्स-रे काढला.

आवश्यक वैद्यकीय उपचारांचा भाग म्हणून त्याला टीटी इंजेक्शनही देण्यात आले. याशिवाय गुप्तांगाच्या भागातून फॉरेन्सिक तपासणीसाठी स्वॅब नमुना घेण्यात आला. हा नमुना सीलबंद करून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे. कापूरबावडी पोलिसांमार्फत हा नमुना फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी अर्थात एफएसएलकडे पाठवण्यात येणार आहे. एफएसएलच्या अहवालातून नमुन्याबाबतचे निष्कर्ष स्पष्ट होण्यास मदत होईल.

या प्रकरणात आणखी एक महत्त्वाची बाब समोर आली आहे. पूर्णेकर समर्थकांकडून दगडफेक केल्याचा आरोप असलेल्या अर्जुनच्या हातात दगड आणि विटा असल्याचे फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत. या दृश्यांमुळे प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. अर्जुनच्या भूमिकेबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. एका बाजूला दगडफेकीच्या घटनेतील अर्जुनची कथित भूमिका दर्शवणारे फोटो-व्हिडिओ समोर आले आहेत, तर दुसरीकडे पोलिसांकडून मारहाण आणि लैंगिक अत्याचार झाल्याच्या त्याच्या आरोपांची वैद्यकीय नोंद झाली आहे.

मात्र वैद्यकीय तपासणीत आढळलेल्या जखमा नेमक्या कशामुळे झाल्या, याचा निष्कर्ष केवळ या नोंदींवरून काढता येणार नाही. तसेच लैंगिक अत्याचाराच्या आरोपांबाबत एफएसएल अहवाल आणि पुढील तपास महत्त्वाचा ठरणार आहे. या सर्व घडामोडींमुळे प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणातील तपासाला नवे महत्त्व प्राप्त झाले आहे. अर्जुनचे आरोप, वैद्यकीय नोंदी, फॉरेन्सिक अहवाल आणि समोर आलेले व्हिडिओ या सर्व बाबींच्या आधारे तपासात पुढे काय निष्पन्न होते, याकडे लक्ष लागले आहे.

Follow Us
देवेंद्र फडणवीस, अन् ठाकरे बंधू एकत्र; बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली
Thackeray Brothers and Fadnavis : देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे अन् राज ठाकरे एकत्र; बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली?
बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सहाही जणांचा मृत्यू
Uttarakhand Helicopter Crash : बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं; जोशीमठजवळ कोसळून, पायलटसह सहाही जणांचा दुर्दैवी मृत्यू
मी तर टीझर दिलाय, पूर्ण पिक्चर अजून बाकी; धैर्यशील पाटलांच्या विधानाने
Solapur : मी तर टीझर दिलाय, पूर्ण पिक्चर अजून बाकी; धैर्यशील मोहिते पाटलांच्या विधानाने सोलापूरच्या राजकारणात चर्चांना उधाण
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; राम पूर्णेकरांनी घेतली....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; राम पूर्णेकरांनी घेतली वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट
बद्रीनाथहून निघालं, पण मध्येच संपर्क तुटला; सहा जणांसह हेलिकॉप्टरचा...
Helicopter Missing : बद्रीनाथहून निघालं, पण मध्येच संपर्क तुटला; सहा जणांसह हेलिकॉप्टरचा शोध सुरू
समृद्धी महामार्ग रोखण्याआधीच पोलिसांची कारवाई; आमदार नितीन देशमुखांसह
Shivsena UBT : समृद्धी महामार्ग रोखण्याआधीच पोलिसांची कारवाई; आमदार नितीन देशमुखांसह ठाकरे गटाचे कार्यकर्ते ताब्यात
BEST कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; एवढ्या हजारांचा बोनस जाहीर....
BEST Employees Diwali Bonus : BEST कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; एवढ्या हजारांचा बोनस जाहीर; ३ नोव्हेंबरला खात्यात होणार जमा
परवानगी नाकारली, तरी ठाकरे गटाचा मोर्चा समृद्धी महामार्गाच्या दिशेने
Shivsena UBT : परवानगी नाकारली, तरी ठाकरे गटाचा मोर्चा समृद्धी महामार्गाच्या दिशेने; शेलू बाजारात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
मोदी सरकारनेच विजय मल्ल्यांना देश सोडायला भाग पाडलं; राऊतांचा....
Sanjay Raut : मोदी सरकारनेच विजय मल्ल्यांना देश सोडायला भाग पाडलं; संजय राऊतांचा पुस्तकातून गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?
महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे द्या, त्या बड्या नेत्याचं
Shivsena : महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे द्या, त्या बड्या नेत्याचं मोठं विधान