Uttarakhand Helicopter Crash : बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं; जोशीमठजवळ कोसळून, पायलटसह सहाही जणांचा दुर्दैवी मृत्यू
उत्तराखंडमधील जोशीमठजवळ छायी गावात बद्रीनाथहून निघालेले हेलिकॉप्टर क्रॅश झाले आहे. या दुर्दैवी घटनेत पायलटसह हेलिकॉप्टरमधील सर्व सहा प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. प्रशासनाकडून बचावकार्य सुरू करण्यात आले होते, मात्र तत्पूर्वीच सर्वांचा बळी गेला. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनीही घटनेची गंभीर दखल घेतली आहे.
उत्तराखंडमधील जोशीमठजवळ छायी गावात बद्रीनाथहून निघालेले एक हेलिकॉप्टर क्रॅश झाले आहे. या अत्यंत दुर्दैवी घटनेत पायलटसह हेलिकॉप्टरमधील सर्व सहा जणांचा मृत्यू झाला आहे. दुपारी साधारणतः १ वाजून १२ मिनिटांच्या सुमारास ही घटना घडली.
हेलिकॉप्टर कोसळल्याची माहिती मिळताच प्रशासनाने तात्काळ बचावकार्य सुरू केले. जिल्हा प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि एसडीआरएफच्या टीम घटनास्थळी पोहोचल्या होत्या. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनीही या घटनेची गंभीर दखल घेतली होती आणि जखमींना तातडीने एअरलिफ्ट करून मोठ्या रुग्णालयात दाखल करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, बचावकार्य सुरू असतानाच हेलिकॉप्टरमधील सर्व सहा प्रवाशांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली. या घटनेमुळे उत्तराखंडमध्ये शोककळा पसरली आहे.
Published on: Oct 30, 2026 04:28 PM
बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सहाही जणांचा मृत्यू
मी तर टीझर दिलाय, पूर्ण पिक्चर अजून बाकी; धैर्यशील पाटलांच्या विधानाने
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; राम पूर्णेकरांनी घेतली....
बद्रीनाथहून निघालं, पण मध्येच संपर्क तुटला; सहा जणांसह हेलिकॉप्टरचा...

