AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

2004 मध्ये मराठमोळं गाणं ठरलं सुपर-डुपर हिट, तेंव्हापासून 2026पर्यंत तरुणाईच्या ओठांवर; कायम आहे तीच जादू!

2004 मध्ये मराठी चित्रपटांनाही भरभराट येऊ लागलेली. यावर्षी एक भारी सिनेमा प्रदर्शित झाला होता. या सिनेमानं लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं होतं. याच सिनेमातील एक गाणंही अत्यंत लोकप्रिय आहे. आजही ते ऐकलं जातं.

2004 मध्ये मराठमोळं गाणं ठरलं सुपर-डुपर हिट, तेंव्हापासून 2026पर्यंत तरुणाईच्या ओठांवर; कायम आहे तीच जादू!
Superhit Marathi SongImage Credit source: social media
| Updated on: Oct 30, 2026 | 11:22 PM
Share

संगीत विश्वात काही गाणी अशी असतात, जी रिलीज झाल्यानंतर काळानुरूप जुनी होत नाहीत, तर जसजशी वर्षे लोटतात तसतशी ती अधिकच समृद्ध आणि जवळची वाटू लागतात. २००४ मध्ये रिलीज झालेला केदार शिंदेंचा अगं बाई अरेच्चा! हा सिनेमा असो किंवा त्यातील विनोद असो, प्रेक्षकांच्या मनात त्याचे वेगळे स्थान आहे. याच चित्रपटातील ‘मन उधाण वाऱ्याचे’ हे गाणं म्हणजे मराठी रसिकांसाठी एक भावनिक प्रवास आहे, जो दोन दशके उलटून गेल्यानंतरही रसिकांच्या ओठांवर आणि मोबाईलच्या प्ले-लिस्टमध्ये कायम आहे.

मनाचे कोपरे उलगडणारे शब्द अन् जादूई आवाज

प्रेमात पडल्यावर माणसाच्या मनात चाललेला विचारांचा कोलाहल, हुरहूर आणि व्यक्त न करता येणाऱ्या भावनांना अचूक शब्दांत मांडण्याचे कसब गीतकार गुरु ठाकूर यांनी या गाण्यातून साधले आहे. त्यातच संगीतकार जोडी अजय-अतुल यांनी रचलेली अत्यंत चपखव चाल आणि त्याला शंकर महादेवन यांनी आपल्या भारदस्त पण तितक्याच संवेदनशील आवाजात दिलेला न्याय, या दिग्गज जोडीने या गाण्याला अजरामर करून सोडले आहे. हे गाणं ऐकताना केवळ कान तृप्त होत नाहीत, तर मनाचा प्रत्येक कोपराही आनंदून जातो.

आजच्या डिजिटल युगातही अफाट क्रेझ

आजच्या बदलत्या काळात अनेक नवीन गाणी येतात आणि काही दिवसांतच विस्मृतीत जातात. मात्र, ‘मन उधाण वाऱ्याचे’ या गाण्याची जादू आजच्या तरुणाईपासून ते जुन्या पिढीपर्यंत सर्वांमध्ये कायम आहे. व्हॉट्सॲप स्टेटस असो, इन्स्टाग्राम रील्स असोत किंवा एकांतात बसून शांतपणे ऐकण्याची प्लेलिस्ट असो, हे गाणं आजही तितक्याच आपुलकीने ऐकले जाते. जुन्या आठवणींना उजाळा देणारी ही कलाकृती मराठी संगीताचा एक सोनेरी अध्याय ठरली आहे, ज्याची सर आजच्या कोणत्याही गाण्याला येऊ शकत नाही.

गाण्याचे बोल

मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते नात्यांच्या बंधात धुंद मोहरते [मन उधाण वा-याचे गुज पावसाचे का होते बेभान कसे गहिवरते मन उधाण वा-याचे……

तनाना तानानानानानानानानाना उ होहोहो….

आकाशी स्वप्नांच्या हरपून भान शिरते हुरहुरत्या सांजेला कधी एकटेच झुलते सावरते बावरते झडते अडखळते का पडते कधी आशेच्या हिंदोळ्यावर मन हे वेडे झुलते मन तरंग होवून पाण्यावरती फिरते अन क्षणात फिरुनी आभाळाला भिडते

मन उधाण वा-याचे गुज पावसाचे का होते बेभान कसे गहिवरते मन उधाण वा-याचे……

रुणझूणते गुणगुणते कधी गुंतते हरवते कधी गही-या डोळ्यांच्या डोहात पार बुडते तळमळते सारखे भाबडे नकळत का भरकटते

कधी मोहाच्या चार क्षणांना मन हे वेडे भुलते

जाणते जरी हे पुन्हा पुन्हा का चुकते भाबडे तरी भासांच्या मागुनी पळते [मन उधाण वा-याचे गुज पावसाचे का होते बेभान कसे गहिवरते मन उधाण वा-याचे……

Follow Us
देवेंद्र फडणवीस, अन् ठाकरे बंधू एकत्र; बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली
Thackeray Brothers and Fadnavis : देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे अन् राज ठाकरे एकत्र; बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली?
बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सहाही जणांचा मृत्यू
Uttarakhand Helicopter Crash : बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं; जोशीमठजवळ कोसळून, पायलटसह सहाही जणांचा दुर्दैवी मृत्यू
मी तर टीझर दिलाय, पूर्ण पिक्चर अजून बाकी; धैर्यशील पाटलांच्या विधानाने
Solapur : मी तर टीझर दिलाय, पूर्ण पिक्चर अजून बाकी; धैर्यशील मोहिते पाटलांच्या विधानाने सोलापूरच्या राजकारणात चर्चांना उधाण
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; राम पूर्णेकरांनी घेतली....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; राम पूर्णेकरांनी घेतली वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट
बद्रीनाथहून निघालं, पण मध्येच संपर्क तुटला; सहा जणांसह हेलिकॉप्टरचा...
Helicopter Missing : बद्रीनाथहून निघालं, पण मध्येच संपर्क तुटला; सहा जणांसह हेलिकॉप्टरचा शोध सुरू
समृद्धी महामार्ग रोखण्याआधीच पोलिसांची कारवाई; आमदार नितीन देशमुखांसह
Shivsena UBT : समृद्धी महामार्ग रोखण्याआधीच पोलिसांची कारवाई; आमदार नितीन देशमुखांसह ठाकरे गटाचे कार्यकर्ते ताब्यात
BEST कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; एवढ्या हजारांचा बोनस जाहीर....
BEST Employees Diwali Bonus : BEST कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; एवढ्या हजारांचा बोनस जाहीर; ३ नोव्हेंबरला खात्यात होणार जमा
परवानगी नाकारली, तरी ठाकरे गटाचा मोर्चा समृद्धी महामार्गाच्या दिशेने
Shivsena UBT : परवानगी नाकारली, तरी ठाकरे गटाचा मोर्चा समृद्धी महामार्गाच्या दिशेने; शेलू बाजारात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
मोदी सरकारनेच विजय मल्ल्यांना देश सोडायला भाग पाडलं; राऊतांचा....
Sanjay Raut : मोदी सरकारनेच विजय मल्ल्यांना देश सोडायला भाग पाडलं; संजय राऊतांचा पुस्तकातून गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?
महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे द्या, त्या बड्या नेत्याचं
Shivsena : महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे द्या, त्या बड्या नेत्याचं मोठं विधान