AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठा राजकीय भूकंप? थेट मुख्यमंत्र्यांविरोधातच 15 आमदारांची सीक्रेट मिटिंग, पडद्याआड मोठ्या घडामोडी

जम्मू-काश्मीरमध्ये मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांना मंत्रिमंडळ फेरबदल महागात पडला आहे. नॅशनल कॉन्फरन्सचे 15 नाराज आमदार मुख्यमंत्रीविरोधात एकवटले असून त्यांनी गुप्त बैठक घेतली. या आमदारांनी बंडाचे निशाण फडकावले असून उमर सरकारचे भवितव्य धोक्यात आले आहे. यामुळे राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

मोठा राजकीय भूकंप? थेट मुख्यमंत्र्यांविरोधातच 15 आमदारांची सीक्रेट मिटिंग, पडद्याआड मोठ्या घडामोडी
Omar AbdullahImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 30, 2026 | 11:26 PM
Share

जम्मू-काश्मीरमध्ये मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांना कॅबिनेटमध्ये फेरबदल करणं चांगलंच महागात पडलं आहे. या फेरबदलामुळे नॅशनल कॉन्फ्रन्सचे 15 आमदार नाराज आहेत. या नाराज आमदारांनी बंडाचं निशाण फडकावलं आहे. त्यांनी श्रीनगरमध्ये एक सीक्रेट मिटिंग बोलावली. त्यात पुढील रणनीतीवर चर्चा झाली. तसेच कॅबिनेटमध्ये झालेल्या फेरबदलावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे हे बंड उमर अब्दुल्ला कसे थोपवतात? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

या नाराज आमदारांची बैठक लोलाब येथील आमदार कैसर जमशीद यांच्या श्रीनगरमधील घरी झाली. या बैठकीला नॅशनल कॉन्फ्रन्सचे ज्येष्ठ आमदार मुबारक गुल मजीद लर्मी सुद्धा उपस्थित होते. यावेळी सर्वच आमदारांनी नुकत्याच झालेल्या कॅबिनेटच्या फेरबदलावर नाराजी व्यक्त केली, अशी माहिती सूत्रांनी दिली.

मंत्रिमंडळातून हटवा

ज्या मंत्र्यांनी दोन वर्ष मंत्रिपदं भोगली आहेत, त्यांना मंत्रिमंडळातून हटवण्याची मागणी या नाराज आमदारांनी केली आहे. याच मुद्द्यावर बैठकीत चर्चा करण्यात आली असून पुढील रणनीती ठरवण्यात आली आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसात उमर सरकारचं भवितव्य दिसून येणार आहे. इकडे ही बैठक झालेली असतानाच श्रीनगरमध्ये रात्री उशिरापर्यंत मोठ्या घडामोडी घडत आहेत. नॅशनल कॉन्फ्रेन्सचे अध्यक्ष फारुक अब्दुल्ला यांनी नवनियुक्त मंत्री अली मोहम्मद सागर यांना पार्टीच्या महासचिवपदी कायम राहण्याचे आदेश दिले आहेत.

पक्ष कार्यालयाबाहेर निदर्शने

हाजी अली मोहम्मद सागर हे पुढील आदेश येईपर्यंत पक्षाचे महासचिव राहणार आहेत, असं अब्दुल्ला यांनी म्हटलं आहे. त्यांनी तसा आदेशच कााढला आहे. या आधी कॅबिनेटमध्ये फेरबदल केल्यावर लगेचच ज्येष्ठ नेते मुबारक गुल यांना पार्टी महासचिवपदी नियुक्त करण्यात आलं होतं. त्यांची मनधरणी करण्यासाठी हा प्रयत्न करण्यात आला होता. कारण मुबारक यांना मंत्रिपद दिलं नव्हतं. कॅबिनेटचा विस्तार झाल्यानंतर नाराज मुबारक समर्थकांनी श्रीनगर येथील पक्षाच्या मुख्यालयासमोर निदर्शनेही केली होती. तसेच नवनिर्वाचित मंत्री सागर यांच्या विरोधात घोषणाबाजीही केली होती. त्यामुळेच मुबारक यांना महासचिवपद देण्यात आलं होतं. मात्र, त्यानंतर हा निर्णय बदलण्यात आला आहे.

Follow Us
देवेंद्र फडणवीस, अन् ठाकरे बंधू एकत्र; बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली
Thackeray Brothers and Fadnavis : देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे अन् राज ठाकरे एकत्र; बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली?
बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सहाही जणांचा मृत्यू
Uttarakhand Helicopter Crash : बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं; जोशीमठजवळ कोसळून, पायलटसह सहाही जणांचा दुर्दैवी मृत्यू
मी तर टीझर दिलाय, पूर्ण पिक्चर अजून बाकी; धैर्यशील पाटलांच्या विधानाने
Solapur : मी तर टीझर दिलाय, पूर्ण पिक्चर अजून बाकी; धैर्यशील मोहिते पाटलांच्या विधानाने सोलापूरच्या राजकारणात चर्चांना उधाण
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; राम पूर्णेकरांनी घेतली....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; राम पूर्णेकरांनी घेतली वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट
बद्रीनाथहून निघालं, पण मध्येच संपर्क तुटला; सहा जणांसह हेलिकॉप्टरचा...
Helicopter Missing : बद्रीनाथहून निघालं, पण मध्येच संपर्क तुटला; सहा जणांसह हेलिकॉप्टरचा शोध सुरू
समृद्धी महामार्ग रोखण्याआधीच पोलिसांची कारवाई; आमदार नितीन देशमुखांसह
Shivsena UBT : समृद्धी महामार्ग रोखण्याआधीच पोलिसांची कारवाई; आमदार नितीन देशमुखांसह ठाकरे गटाचे कार्यकर्ते ताब्यात
BEST कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; एवढ्या हजारांचा बोनस जाहीर....
BEST Employees Diwali Bonus : BEST कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; एवढ्या हजारांचा बोनस जाहीर; ३ नोव्हेंबरला खात्यात होणार जमा
परवानगी नाकारली, तरी ठाकरे गटाचा मोर्चा समृद्धी महामार्गाच्या दिशेने
Shivsena UBT : परवानगी नाकारली, तरी ठाकरे गटाचा मोर्चा समृद्धी महामार्गाच्या दिशेने; शेलू बाजारात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
मोदी सरकारनेच विजय मल्ल्यांना देश सोडायला भाग पाडलं; राऊतांचा....
Sanjay Raut : मोदी सरकारनेच विजय मल्ल्यांना देश सोडायला भाग पाडलं; संजय राऊतांचा पुस्तकातून गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?
महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे द्या, त्या बड्या नेत्याचं
Shivsena : महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे द्या, त्या बड्या नेत्याचं मोठं विधान