दिल्लीत भेटीगाठी सुरू! राहुल गांधींसोबतच्या भेटीनंतर किरण रिजीजू यांची थेट अमित शाह यांच्यासोबत बैठक, पडद्याआड मोठ्या अडामोडी
संसदीय कार्यमंत्री किरण रिजीजू यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची नुकतीच भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. या अनपेक्षित भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. या भेटीमागील नेम
संसदीय कार्यमंत्री किरण रिजीजू यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची नुकतीच भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. या अनपेक्षित भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. या भेटीमागील नेमके कारण काय होते, याबाबत स्वतः किरण रिजीजू यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
किरण रिजीजू यांनी राहुल गांधी यांची प्रत्यक्ष भेट घेतली. या चर्चेत अधिवेशनात वारंवार होणाऱ्या गोंधळाबाबत चर्चा करण्यात आली. पावसाळी अधिवेशनाचं कामकाज सुरु होताच विरोधकांचा गदारोळ सुरु होतो याबाबत चर्चा कारण्यात आली. या भेटीनंतर त्यांची अमित शाह यांच्यासोबत बैठक होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. इतकेच नाही तर या बैठकीत नवनियुक्त केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी देखील उपस्थित असतील, अशी माहितीही समोर आली आहे.
एकूणच दिल्लीतील भेटीगाठी वाढल्या असून पावसाळी अधिवेशनातील आगामी काही दिवस महत्त्वाचे ठरतील, अशीही चर्चा आहे.
Published on: Aug 05, 2026 02:57 PM
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..

