मोठी बातमी! कर्जमाफीचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात कधी जमा होणार जाणून घेण्यासाठी व्हिडीओ पहाच
राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. कर्जमाफीच्या पहिल्या टप्प्यातील निधी आज किंवा उद्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात होणार आहे.
राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. कर्जमाफीच्या पहिल्या टप्प्यातील निधी आज किंवा उद्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात होणार असल्याची माहिती राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिली आहे. या निर्णयामुळे लाखो शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे.
सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी सांगितले की, कर्जमाफीच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील 11 लाख 46 हजार शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. संबंधित निधी थेट लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
तसेच, कर्जमाफीच्या दुसऱ्या टप्प्यात आणखी 13 लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. उर्वरित पात्र शेतकऱ्यांनाही टप्प्याटप्प्याने कर्जमाफीचा लाभ मिळेल, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, कर्जमाफीच्या निधी वितरणाबाबत राज्यातील शेतकरी उत्सुक असून, पहिल्या टप्प्यातील रक्कम खात्यात जमा होण्यास सुरुवात झाल्यानंतर पुढील टप्प्याचे वेळापत्रकही जाहीर होण्याची शक्यता आहे.
Published on: Aug 05, 2026 03:36 PM
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद

