LIVE अपडेट्स! शिवसेना पक्ष, चिन्हाप्रकरणी सुनावणी सुरू; सुरतहून आमदार गुवाहटीला गेले हा योगायोग…
शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्हाच्या वादासह बंडखोर आमदारांच्या अपात्रतेप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आज महत्त्वाची सुनावणी सुरू झाली आहे
शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्हाच्या वादासह बंडखोर आमदारांच्या अपात्रतेप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आज महत्त्वाची सुनावणी सुरू झाली आहे. या सुनावणीकडे राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल युक्तिवाद मांडत आहेत. सुनावणी दुपारी 2 वाजून 50 मिनिटांनी सुरू झाली.
कपिल सिब्बल यांनी आपल्या युक्तिवादात उद्धव ठाकरे पक्षप्रमुख झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांची नेतेपदी नियुक्ती केली होती, असा मुद्दा मांडला. एकनाथ शिंदे यांना पद हे दिलं यावर उद्धव ठाकरेंनी सही केली आहे. ठाकरे यांच्या कार्यकाळात करण्यात आलेल्या नियुक्त्यांची माहिती निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर उपलब्ध असल्याचेही त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
दरम्यान, शिवसेनेत बंड झाल्यानंतर आमदार सुरुवातीला सुरतला गेले होते. त्यानंतर अचानक हे आमदार गुवाहाटीला गेले. आमदारांचे सुरतहून गुवाहाटीला जाणे हा केवळ योगायोग नसल्याचा दावा कपिल सिब्बल यांनी केला.
आता सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणावर पुढील काय युक्तिवाद होतात आणि न्यायालयाकडून कोणते निर्देश दिले जातात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सुनावणीतील प्रत्येक घडामोड महत्त्वाची ठरणार आहे.
Published on: Aug 05, 2026 04:01 PM
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..

