…म्हणून आम्ही मुंबईत 16 जागांवर उमेदवार दिले नाहीत, सुजात आंबेडकरांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट, काँग्रेसवर मोठा आरोप
मोठी बातमी समोर येत आहे, मुंबईमध्ये काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीला 62 जागा दिल्या होत्या, मात्र त्यातील 16 जागांवर वंचित बहुजन आघाडीने उमेदवार दिला नाही, यावर प्रतिक्रिया देताना सुजात आंबेडकर यांनी मोठं विधान केलं आहे.

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, मुंबई महापालिका निवडणुकीसाठी यावेळी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांची युती झाली आहे. काँग्रेसने मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये वंचित बहुज आघाडीला 62 जागा दिल्या होत्या, मात्र ऐनवेळी वंचितने 62 पैकी 16 जागांवर उमेदवारच उभा केला नाही, या जागा पुन्हा काँग्रेसला दिल्या, मात्र काँग्रेसला देखील या जागांवर उमेदवार उभा करता न आल्यानं आता या ठिकाणी भाजप, शिवसेना युती आणि मनसे व शिवसेना ठाकरे गट असा थेट सामना असणार आहे. या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीने अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान यावर प्रतिक्रिया देताना आता वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. यावेळी त्यांनी काँग्रेसवर देखील आरोप केला.
नेमकं काय म्हणाले सुजात आंबेडकर?
मुंबई महापालिकेसाठी काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीला एकूण 62 जागा दिल्या हेत्या, त्यापैकी ऐनवेळी वंचित बहुजन आघाडीने 16 जागांवर उमेदवारच उभा केला नाही. यावर प्रतिक्रिया देताना सुजात आंबेडकर यांनी मोठं विधान केलं आहे. मुंबईत वंचितने 16 जागी उमेदवारी दिली नाही कारण, काँग्रेसने हेकेखोरपणा केल्याचं त्यांनी म्हटलं आहे. कारण आम्हाला ज्या 16 जागा हव्या होत्या त्या काँग्रेसने आम्हाला दिल्या नाहीत, काँग्रेसच्या एका मोठ्या नेत्याच्या घरात 6 ते 7 जणांना उमेदवारी द्यायची होती, त्यामुळे हा प्रकार घडला, त्यामुळे आम्ही देखील 16 जागांवर उमेदवारी दिली नाही, असं सुजात आंबेडकर यांनी म्हटलं आहे. दरम्यान पुढे बोलताना मुंबईत काही ठिकाणी आम्ही एकत्रित आणि काही ठिकाणी वेगवेगळा प्रचार करणार आहोत, जशी गरज असेल तसा प्रचार करू, असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे. मी ठाकरेंचा वचनामा बघिता आता आमचा देखील वचनामा येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये प्रसिद्ध होईल. महाराष्ट्रात बरेच ठिकाणी आमचे महापौर निवडून येण्याची शक्यता आहे, आमंच जिल्हा परिषद निवडणुकीवर देखील लक्ष असणार आहे, असं यावेळी आंबेडकर यांनी म्हटलं आहे.
