AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डोळस तडे, आंधळी यंत्रणा! मेट्रो-4 च्या खांब्याला उद्घाटनापूर्वीच मोठे तडे

डोळस तडे, आंधळी यंत्रणा! मेट्रो-4 च्या खांब्याला उद्घाटनापूर्वीच मोठे तडे

| Updated on: Feb 23, 2026 | 10:09 AM
Share

मुंबई मेट्रो ४ च्या घाटकोपर येथील खांबाला उद्घाटनापूर्वीच मोठे तडे गेल्याचे समोर आले आहे. मात्र, एमएमआरडीए प्रशासनाने तडे पडल्याचा इन्कार केला आहे. सजग नागरिकांच्या व्हिडिओ आणि टीव्ही नाईन मराठीच्या पडताळणीत तडे स्पष्टपणे दिसत असल्याने कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

मुंबई मेट्रो चारच्या खांबांना उद्घाटनापूर्वीच तडे गेल्याने कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. घाटकोपर येथील आर सिटी मॉलजवळ एका मेट्रोच्या खांबाला मोठे तडे गेल्याचा व्हिडिओ एका सजग मुंबईकराने सोशल मीडियावर व्हायरल केला होता. यानंतर मुंबई महानगरपालिकेने एमएमआरडीएला या संदर्भात पत्र पाठवले.

या प्रकरणी एमएमआरडीए प्रशासनाने मात्र मेट्रोच्या पुलाला कुठेही तडे गेले नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. तसेच, एक फोटो जारी करून तड्यांचे आरोप फेटाळले आहेत. मात्र, टीव्ही 9 मराठीच्या टीमने घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता, खांबाला स्पष्टपणे तडे गेल्याचे आणि बीमचा काही भाग निघाल्याचे दिसून आले.

यापूर्वीही मुंबईतील मेट्रो प्रकल्पांमध्ये काही त्रुटी समोर आल्या होत्या. मुलुंड येथे स्लॅब कोसळून एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता, तर वरळी येथे भुयारी मेट्रोत पाणी शिरले होते. एमएमआरडीएच्या स्पष्टीकरणामुळे आणि वस्तुस्थितीतील तफावतीमुळे नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे.

 

Published on: Feb 23, 2026 10:09 AM