शरद पवारांवर पुढील दोन दिवस उपचार सुरू राहणार
शरद पवार यांना पुन्हा पुण्यातल्या रुबी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उलट्या आणि डिहायड्रेशनचा त्रास झाल्याने त्यांना उपचारासाठी आणण्यात आले. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांची प्रकृती स्थिर असून, ब्लड टेस्ट व सिटी स्कॅनचे रिपोर्ट नॉर्मल आहेत. पुढील एक-दोन दिवसांत त्यांना डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे.
शरद पवार यांना पुन्हा एकदा पुण्यातल्या रुबी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. उलट्यांचा त्रास होऊन डिहायड्रेशन झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, पुढील दोन दिवस त्यांच्यावर उपचार केले जातील अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून, चिंता करण्याची गरज नसल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शरद पवार यांच्यावर रुबी रुग्णालयात दाखल केल्यानंतर ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करण्यात आले. या दोन्ही चाचण्यांचे रिपोर्ट नॉर्मल आले आहेत. डॉक्टरांनी सांगितले की, त्यांना सौम्य डिहायड्रेशन झाले असून, थोडं सलाईन देऊन त्यांची प्रकृती लवकरच सुधारेल. एक ते दोन दिवसांत त्यांना डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे.
यापूर्वीही शरद पवार यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मागील आठवड्यात छातीत कफ झाल्याने त्यांना बारामतीवरून पुण्याला आणण्यात आले होते आणि पाच दिवस त्यांच्यावर उपचार करण्यात आले होते. उपचारानंतर त्यांची प्रकृती सुधारली होती, मात्र आता पुन्हा त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले आहे.
Published on: Feb 23, 2026 10:23 AM
आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक..
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू...
