AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तिकीट द्या नाहीतर जीवाचं काहीतरी करून घेईन, मनपा निवडणुकीपूर्वी भाजप कार्यकर्त्याची धमकी, व्हिडीओमुळे खळबळ

सोलापूर महापालिका निवडणुकीत उमेदवारी मिळावी म्हणून भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते अनंत धुम्मा यांनी पक्षाला थेट इशारा दिला आहे. तिकीट न मिळाल्यास टोकाचे पाऊल उचलण्याची धमकी दिल्याने खळबळ उडाली आहे.

तिकीट द्या नाहीतर जीवाचं काहीतरी करून घेईन, मनपा निवडणुकीपूर्वी भाजप कार्यकर्त्याची धमकी, व्हिडीओमुळे खळबळ
bjp maharashtra 12
| Edited By: | Updated on: Dec 18, 2025 | 10:50 AM
Share

राज्यात सध्या महापालिका निवडणुकीवरुन वातावरण तापले आहे. सध्या सत्ताधारी आणि विरोधी दोन्हीही पक्षात तिकीट मिळवण्यासाठी जोरदार लॉबिंग सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच आगामी सोलापूर महानगरपालिकेत निवडणुकीच्या तिकीट वाटपावरून भाजपमध्ये अंतर्गत बंडाळी उफाळून येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या ४० वर्षांपासून पक्षाशी एकनिष्ठ असलेले कार्यकर्ते अनंत धुम्मा यांनी उमेदवारीसाठी थेट पक्षनेत्यांनाच इशारा दिला आहे. त्यामुळे सोलापुरात मोठी खळबळ उडाली आहे. मला उमेदवारी मिळायलाच हवी, अन्यथा माझ्या जीवाचे बरे-वाईट झाल्यास त्याला पक्ष जबाबदार असेल,” असे खळबळजनक विधान अनंत धुम्मा यांनी केले आहे.

नेमका प्रकार काय?

सोलापूर महानगरपालिकेच्या १०२ जागांसाठी भाजपकडून इच्छुकांची मोठी गर्दी झाली आहे. तब्बल १२०० हून अधिक कार्यकर्त्यांनी उमेदवारीसाठी अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये जुन्या आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलले जाण्याची भीती व्यक्त होत आहे. अनंत धुम्मा हे गेल्या चार दशकांपासून भाजपचे काम करत आहेत. यावेळी सोलापूर महापालिका निवडणुकीसाठी संधी मिळावी यासाठी ते आग्रही आहेत. त्यांचा एक व्हिडीओदेखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. त्यामध्ये त्यांनी आत्महत्येसारखा टोकाचा इशारा दिल्याचे दिसून येत आहे.

माझ्या जीवाचं बरं-वाईट काही झालं तर त्याला मी जबाबदार नाही

मी गेल्या ४० वर्षांपासून भाजपचे काम करत आहे. पक्ष स्थापन झाल्यापासून मी काम करतोय. भाजप पक्षावर विश्वास ठेवून मी पक्षाचे काम करत आहे. मला यावेळी १०० टक्के न्याय मिळेल, असे मला वाटत आहे. तसेच मी भाजपला सांगू इच्छितो की माझ्यासारख्या निष्ठावंत कार्यकर्त्यासोबत जर तुम्ही चुकीचं करत असाल आणि माझ्या जीवाचं बरं-वाईट काही झालं तर त्याला मी जबाबदार नाही, असे अनंत धुम्मा म्हणाले.

मी इतके वर्ष काम करत आहे. मी नगरसेवक नसतानाही एक कार्यकर्ता म्हणून आज केंद्राच्या योजना, राज्य सरकारच्या योजना घराघरात पोहोचवल्या आहेत. मी इतकं सर्व काम करुन जर आम्हाला न्याय मिळत नसेल तर स्वत:ला काहीतरी करुन घेण्याशिवाय पर्याय नाही. जे निष्ठावंत आहेत, जे काम करतात त्यांना १०० टक्के न्याय देण्याचा प्रयत्न करा, असेही अनंत धुम्मा यांनी यावेळी सांगितले. मात्र व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यांनी आपण हे विधान भावनेच्या भरात केल्याचे स्पष्ट केले आहे.

निष्ठावंतांना सांभाळण्याचे मोठे आव्हान

दरम्यान या सर्व प्रकरणावर भाजप शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे. सर्वच कार्यकर्त्यांना आपल्याला न्याय मिळावा असे वाटते, मात्र पक्षाला काही निर्णय विचारपूर्वक घ्यावे लागतात, असे सांगत त्यांनी जुन्या आणि नव्या कार्यकर्त्यांना सबुरीने घेण्याचा सल्ला दिला आहे. तसेच, कोणत्याही कार्यकर्त्यांने कायदा हातात घेऊन शहराचे वातावरण बिघडवू नये, असे आवाहनही तडवळकर यांनी केले आहे. यामुळे उमेदवारी वाटप करताना भाजपसमोर निष्ठावंतांना सांभाळण्याचे मोठे आव्हान उभे राहिल्याचे पाहायला मिळत आहे.

नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?.
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!.
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?.
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?.
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?.