AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Solapur : तृतीयपंथी उमेदवाराची हत्या ; तीन मित्रांनाच अटक, एका इंजिनिअरींगच्या विद्यार्थ्याचाही समावेश

सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग 16 मधून निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या अय्युब सय्यद यांची नुकतिच हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाती तिघा आरोपींना अटक करण्यात यश आले आहे.

Solapur : तृतीयपंथी उमेदवाराची हत्या ; तीन मित्रांनाच अटक, एका इंजिनिअरींगच्या विद्यार्थ्याचाही समावेश
| Edited By: | Updated on: Dec 28, 2025 | 7:50 PM
Share

एकीकडे महानगर पालिकांच्या निवडणूकीची धामधूम सुरु असताना सोलापूर महापालिका निवडणूकीत इच्छुक असलेल्या तृतीयपंथीयाच्या हत्या प्रकरणात नवा खुलासा झाला आहे. तृतीयपंथी अय्युब सय्यद यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी हे विद्यार्थी असून त्यातील एक आरोपी इंजिनिअरिंगचा विद्यार्थी असल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणात तिघाही आरोपींना सोलापूर पोलिसांनी अटक केली आहे.

तृतीयपंथी अय्युब सय्यद याला सोलापूर महापालिका निवडणूकीत उभे राहायचे होते.सोलापूर महापालिका निवडणूकीत इच्छुक असलेल्या तृतीयपंथी अय्युब सय्यद याची हत्या झाली होती. अय्युबचे मारेकरी हे विद्यार्थी होते. त्यातील एक आरोपी हा इंजिनिअरिंगचा विद्यार्थी आहे. तिन्ही आरोपींना अटक झालेली आहे.

अय्युब हा श्रीमंत होता. त्याच्या अंगावरील सोने, रोकडं, मोबाईल, गाडी पाहून त्याच्या मित्रांचीच नियत बदलली. त्यांनी चोरीच्या उद्देश्याने तृतीयपंथी अय्युबची हत्या केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात उघड झाले आहे. या प्रकरणात ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे यशराज कांबळे, आफताब शेख, वैभव पनगुले अशी आहेत. हत्येनंतर अवघ्या 6 तासात पोलिसांनी गुन्हा उघडकीस आणत आरोपीना अटक केली आहे. हे तिन्ही आरोपी मूळचे लातूरचे असून तिघेही विद्यार्थी आहेत.

आरोपी वैभव पनगुले हा इंजिनीअरिंगचे शिक्षण घेत आहे. शुक्रवारी रात्री आरोपी यशराज कांबळे अय्युब सय्यद सोबत त्याच्या घरी आला होता.त्यानंतर काही वेळाने आरोपी आफताब शेख आणि वैभव पनगुले हे देखील अय्युबच्या घरात दाखल झाले होते. काही वेळाने तिन्ही आरोपींनी उशीने तोंड दाबून अय्युब सय्यद याची हत्या केली. त्याच्याजवळ असलेले दागिने, रोकड आणि गाडी घेऊन ते पसार झाले.

सोने खरे आहे की खोटे ?

सोलापूर पोलिसांच्या गुन्हे शाखेने या तिन्ही आरोपींच्या मुसक्या आवळल्या असून पुढील तपास सुरु आहे. दरम्यान आरोपीकडून चोरीला गेलेले दागिने देखील पोलिसांनी हस्तगत केले आहेत, हे सोने खरे आहे की खोटे याचा तपास सुरु असल्याची माहिती पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी दिली आहे. अय्युब सय्यद हे सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग 16 मधून निवडणुकीसाठी इच्छुक होते.

पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप
पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप.
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा.
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही.
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब.
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत.
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका.
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?.
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य.
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.