‘माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी…,’ काय म्हणाले राज ठाकरे
स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीचे वर्षे सुरु होत आहे. आज बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त षण्मुखानंद हॉल येथे झालेल्या सोहळ्यात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपले मन मोकळे केले. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत, युवानेते अमित ठाकरे आदी उपस्थित होते.
आजची ही राजकारणाची परिस्थिती पाहिली तर गुलामांचा बाजार भरला आहे असे वाटते. हेच चित्र पाहिल्यानंतर आज मला असे वाटतंय की बाळासाहेब नाहीएत हे बरे असे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी षण्मुखानंद येथे झालेल्या कार्यक्रमात म्हटले आहे. राज ठाकरे पुढे म्हणाले की आज जे राजकीय चित्र समोर आहे.. तो माणूस किती व्यतिथ झाला असता. महाराष्ट्रात माणसांचे लिलाव चालू आहेत. कल्याण-डोंबिवलीत शिसारी यावी अशी परिस्थिती आली आहे. हे पाहून व्यथित व्हायला माननीय बाळासाहेब नाहीएत ही चांगली गोष्ट आहे. ज्या गोष्ठी शून्यातून उभ्या केल्या.आज अनेक माणसे दिसतायत ती जी बाळासाहेबांनी निर्माण केली होती. मी . माझ्यासाठी पक्ष सोडणे नव्हते माझ्यासाठी घर सोडणे होते. आता अनेक वर्षे झाली आहेत. अनेक गोष्टी मला उमगल्या उद्धवलाही उमगल्या असतील. बाळासाहेब ठाकरे यांच्यावर बोलायचे तर मला या विषयावर व्याख्यान द्यावे लागेल. बाळासाहेब ठाकरे हा माणूस कसा होता हे जगाला कळणं कठीण होते. आम्ही घरातले असून आम्हाला कळले नाही तुम्हाला कसा कळणार? असेही राज ठाकरे यावेळी म्हणाले.
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण...
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला

