AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut: “…म्हणून तीन वर्ष तारीख पे तारीख!” एकनाथ शिंदे यांचा सरन्यायाधीशांसोबतचा फोटो रीट्वीट, संजय राऊतांचा संताप

Sanjay Raut on CJI Surya Kant and Eknath Shinde: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्य कांत यांचे मुंबई विमानतळावर स्वागत गेले. पुष्पगुच्छ देऊन त्यांनी सरन्यायाधीशांचे स्वागत केले. याविषयीचे फोटोही त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले. त्यावरून आता उद्धव सेनेचे खासदार संजय राऊत यांनी रोकठोक भूमिका मांडली आहे.

Sanjay Raut: ...म्हणून तीन वर्ष तारीख पे तारीख! एकनाथ शिंदे यांचा सरन्यायाधीशांसोबतचा फोटो रीट्वीट, संजय राऊतांचा संताप
सरन्यायाधीश सूर्य कांत, एकनाथ शिंदे, संजय राऊतImage Credit source: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या एक्सवरील पोस्टमधून
| Updated on: Jan 24, 2026 | 9:32 AM
Share

Sanjay Raut on CJI Surya Kant and Eknath Shinde: सर्वोच्च न्यायलायाचे सरन्यायाधीश सूर्य कांत यांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई विमानतळावर स्वागत केलं. या स्वागताचे फोटो ही त्यांनी सोशल मीडिया हँडलवरून शेअर केले. शिवसेना फुटीनंतर पक्ष आणि चिन्ह यावरून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी प्रलंबित आहे. तर या आठवड्यात होणारी सुनावणी पुन्हा लांबणीवर पडली आहे. यामध्ये राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह यांच्याही प्रकरणाचा समावेश होता. त्याचवेळी शिंदेंनी सरन्यायाधीशांच्या स्वागताचे फोटो पोस्ट केले. त्यावरून आता उद्धव सेनेने जहरी टीका केली खासदार संजय राऊत यांच्या संतपाचा कडेलोट झाला आहे. त्यांनी अवघ्या एका ओळीत संतापाला वाट मोकळी करून दिली.

एकनाथ शिंदे यांचे ट्वीट काय?

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवरून एक ट्वीट केले आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्य कांत हे आज विशेष कार्यक्रमासाठी मुंबईत आले आहेत. मुंबई विमानतळावर त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री आशिष शेलार, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश श्री.चंद्रशेखर उपस्थित होते.” असे ट्वीट शिंदे यांनी केले आहे. त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून त्यांनी ही पोस्ट केली आहे.

राऊतांची एकाच ओळीत मोठी शंका

एकनाथ शिंदे यांची ट्वीटरवरील पोस्ट संजय राऊत यांनी रिपोस्ट केली. “…म्हणून तीन वर्ष तारीख पे तारीख!” अशी एक ओळ राऊतांनी रीट्वीट करण्यापूर्वी जोडली आहे. शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणीला तीन वर्षे झाले तरी निकाल का लागत नाही याविषयीची शंका त्यांनी या एकाच वाक्यातून समोर आणली आहे. त्यांना अजून काय सुचवायचंय हे मात्र त्यांनी सविस्तरपणे मांडले नाही. पण या तीन ओळीत त्यांच्या भावना मात्र लपलेल्या नाहीत. न्यायव्यवस्थेवर गेल्या काही दिवसांपासून उद्धव सेनेकडून सातत्याने आरोप करण्यात येत आहे. न्यायव्यवस्थेवर विश्वास आणि आदर व्यक्त करतानाच शिवसेना पक्ष, चिन्हाबाबत निर्णयाला होणारा उशीर हा या संतापामागे असल्याचे मानले जाते.

या बुधवारी 21 जानेवारी रोजी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या याचिकांवर सुनावणी होणार होती. पण याप्रकरणी सुनावण लांबणीवर पडली. सुनावणी पुढे ढकलण्यात आली. येत्या चार आठवड्यात सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हांबाबत सुनावणी घेण्यात येईल असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलेले आहे.

कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले...
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा.....
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे.
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट.
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण...
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण....
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला.
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?.
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?.
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या...
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या....
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?.