AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जसप्रीत बुमराह 18 महिन्यांचा ब्रेक घेणार! नेमकं काय घडतंय आणि कशासाठी? ते जाणून घ्या

क्रिकेटचा कोणताही फॉर्मेट असो, जसप्रीत बुमराह भारतीय गोलंदाजीचा कणा आहे. त्याच्या भेदक गोलंदाजीमुळेच भारताला जेतेपदाची चव चाखता आली आहे. असं असताना जसप्रीत बुमराह मोठी विश्रांती घेण्याची शक्यता आहे.

जसप्रीत बुमराह 18 महिन्यांचा ब्रेक घेणार! नेमकं काय घडतंय आणि कशासाठी? ते जाणून घ्या
जसप्रीत बुमराह 18 महिन्यांचा ब्रेक घेणार! नेमकं काय घडतंय आणि कशासाठी? ते जाणून घ्याImage Credit source: BCCI Twitter
| Updated on: Mar 11, 2026 | 6:52 PM
Share

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धा जिंकल्यानंतर आता बीसीसीआय पुढच्या स्पर्धांच्या तयारीसाठी लागली आहे. 2028 टी20 वर्ल्डकप स्पर्धेपर्यंत संघांची बांधणी करावी लागणार आहे. पण या 24 महिन्यांच्या कालावधी दरम्यान जसप्रीत बुमराह 18 महिन्यांचा ब्रेक घेणार असल्याचं बोललं जात आहे. वनडे वर्ल्डकप 2026 आणि त्याचं वर्कलोड मॅनेजमेंट करण्यासाठी हा निर्णय घेतला जाणार असल्याची चर्चा रंगली आहे. गेल्या काही वर्षात जसप्रीत बुमराहसाठी वर्कलोड मॅनेजमेंट राबवलं जात आहे. त्यामुळे 18 महिन्यांच्या कालावधीत भारतीय संघाच्या द्विपक्षीय टी20 मालिकेत खेळणार नाही. 2024 टी20 वर्ल्डकप स्पर्धेनंतर जसप्रीत बुमराह सलग टी20 सामने खेळला आहे. कारण 2026 टी20 वर्ल्डकप स्पर्धेची तयारी सुरू होती. आता भारतीय संघाने जेतेपद मिळवलं आहे. त्यामुळे पुढचं लक्ष्य हे वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धा असणार आहे. या स्पर्धेसाठी आता 13-14 महिन्यांचा अवधी शिल्लक आहे.

वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेचं यजमानपद दक्षिण अफ्रिका, नामिबिया आणि झिम्बाब्वे यांच्याकडे संयुक्तपणे आहे. येथे वेगवान गोलंदाजांना मदत करणाऱ्या खेळपट्ट्या आहेत. त्यामुळे या स्पर्धेत जसप्रीत बुमराहची गरज अधिक आहे. या स्पर्धेच्या तयारीसाठी बुमराह वनडे सामन्यांना प्राधान्य देणार आहे. इतकंच काय तर कसोटी सामनेही खेळणार आहे. जसप्रीत बुमराह 18 महिने द्विपक्षीय टी20 मालिका खेळणार नाही. पण 2028 च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिक स्पर्धेत खेळताना दिसेल. जसप्रीत बुमराहबाबतचा हा निर्णय फक्त आणि फक्त फिटनेस राखण्यासाठी आहे. कारण गेल्या काही वर्षात त्याला दुखापतीचं ग्रहण लागलं आहे. त्याच्या गैरहजेरीत टीम इंडियाची अडचण वाढल्याचं दिसून आलं आहे.

टी20 क्रिकेटमधून जसप्रीत बुमराह निवृत्ती घेणार नाही हे स्पष्ट आहे. पण फिटनेससाठी हा निर्णय घ्यावा लागत आहे. असं असलं तरी जसप्रीत बुमराह इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत खेळणार आहे. सध्या जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्स संघात असून यंदा मैदानात उतरणार आहे. टी20 मालिकेतून ब्रेक घेतला असून वनडे वर्ल्डकप 2027 आणि कसोटी चॅम्पियनशिप स्पर्धेनंतर पुन्हा एकदा टी20 संघात दिसेल. त्यामुळे पुढचे 18 महिने द्विपक्षीय मालिकेत खेळणार नाही.

Follow Us
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच
मोठी बातमी! नवनीत राणांच्या वक्तव्यानंतर... भाजपमधील दिग्गज नेते...
मोठी बातमी! नवनीत राणांच्या वक्तव्यानंतर... भाजपमधील दिग्गज नेत्यांमध्ये गैरसमज?
जरांगे पाटलांना मुंबईत धडकण्याआधीच मोठा धक्का!
Manoj Jarange Patil | जरांगे पाटलांना मुंबईत धडकण्याआधीच मोठा धक्का! 19 सप्टेंबरच्या आझाद मैदानावरील आंदोलनाला परवानगी नाकारली
मुंबईत आंदोलनाची परवानगी नाकारताच मनोज जरांगेंचा मोठा निर्णय, आता...
मुंबईत आंदोलनाची परवानगी नाकारताच मनोज जरांगेंचा मोठा निर्णय, आता सलाईन आणि पाणीही...
गेल्या वर्षी परवानगी होती आणि आता कशी काय नाकारली?-जरांगे
Manoj Jarange Patil | गेल्या वर्षी परवानगी होती आणि आता कशी काय नाकारली?
मुंबईच्या राजाचा मुखदर्शन सोहळा; गणेश गल्लीच्या राजाचा पहिला लूक
Mumbaicha Raja 2026 | मुंबईच्या राजाचा मुखदर्शन सोहळा; गणेश गल्लीच्या राजाचा पहिला लूक