AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gokul : Satej Patil : सत्ता मिळवण्यासाठीच सरकारने कायदा आणला; सतेज पाटलांचा महायुती सरकारवर गंभीर आरोप

Gokul : Satej Patil : सत्ता मिळवण्यासाठीच सरकारने कायदा आणला; सतेज पाटलांचा महायुती सरकारवर गंभीर आरोप

| Updated on: Nov 05, 2026 | 1:16 PM
Share

सतेज पाटील यांनी गोकुळ निवडणुकीसंदर्भात नवीन कायद्यावर सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. जनतेचा आणि न्यायालयाचा जनादेश डावलून सत्ता हस्तगत करण्यासाठीच हा कायदा आणल्याचा दावा त्यांनी केला. लोकशाही प्रक्रियेला बाधा आणून सहकारी संस्थांमध्ये सत्तेच्या गैरवापराचे हे षडयंत्र असल्याचा इशारा पाटलांनी दिला.

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसंदर्भात राज्य सरकारने आणलेल्या नव्या कायद्यावरून काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. सत्ता मिळवण्यासाठीच कॅबिनेटमध्ये हा कायदा बनवण्यात आला, असा थेट हल्लाबोल पाटील यांनी केला. जनतेने नाकारल्यानंतर आणि उच्च न्यायालयाने दिलासा न दिल्याने सरकारने हा अध्यादेश काढला, असे त्यांचे म्हणणे आहे.

उच्च न्यायालयाने पंचवीस निवडून आलेल्या उमेदवारांना नोटीस काढून मतदान घेण्याचे आदेश दिले होते, तरीही सरकारने हा कायदा आणल्याचे पाटील यांनी निदर्शनास आणले. हा लोकशाही संपवण्याचा प्रयत्न असून, जनतेचा जनादेश आणि न्यायालयाचा निर्णय डावलून सत्तेत येण्याचा हा अट्टहास असल्याचे ते म्हणाले. अमूल दूध संघाच्या निर्णयासह इतर उदाहरणे देत त्यांनी हा कायदा सहकार क्षेत्रासाठी धोकादायक असल्याचे प्रतिपादन केले. हा कायदा फक्त गोकुळसाठी नसून, उद्या इतर सहकारी संस्थांमध्येही लागू होऊ शकतो, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

 

 

Published on: Nov 05, 2026 01:16 PM

Follow Us