भाजपकडून हिंदू-मुस्लिम रंग देण्याचं काम! हर्षवर्धन सपकाळांकडून त्या विधानावर स्पष्टीकरण
हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांच्या संदर्भातील वक्तव्यावरून भाजपने केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले. त्यांनी स्पष्ट केले की, छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श टिपू सुलतानने स्वीकारून इंग्रजांविरुद्ध लढा दिला, त्यामुळे दोन्ही प्रतिमा एकत्र लावण्याचे त्यांचे वक्तव्य होते. सपकाळ यांनी भाजपवर मूलभूत मुद्द्यांवरून लक्ष विचलित करण्याचा आरोप केला.
हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांच्यावरील आपल्या वक्तव्यावरून निर्माण झालेल्या वादावर भारतीय जनता पक्षाने केलेल्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. सपकाळ यांनी म्हटले की, त्यांना छत्रपती शिवाजी महाराज भाजपच्या माध्यमातून शिकण्याची आवश्यकता नाही, कारण छत्रपती शिवाजी महाराज ही महाराष्ट्राची आणि काँग्रेसची आन-बान-शान आहेत.
पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना सपकाळ यांनी स्पष्ट केले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेला स्वराज्याचा विचार टिपू सुलतान यांनी आत्मसात केला आणि इंग्रजांविरुद्ध संघर्ष केला. याच दृष्टिकोनातून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांच्या प्रतिमा कार्यालयात सोबत लावण्यासंबंधी वक्तव्य केले होते. त्यांनी भाजपवर जातीय आणि धार्मिक राजकारण करून मूळ मुद्द्यांवरून लक्ष विचलित करण्याचा आरोप केला. सपकाळ यांनी भाजपच्या माफीवीर भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि त्यांच्याच पक्षाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत टिपू सुलतानचे फोटो वापरल्याची आठवण करून दिली.
Published on: Feb 15, 2026 01:56 PM
उद्धव ठाकरेंच्या उपस्थित रामरक्षा पठणाला सुरुवात; पहा व्हिडीओ
उद्धव ठाकरेंच्या राम रक्षा आंदोलनासाठी महंत आणि पंडित दादरमध्ये दाखल
धो-धो पावसादरम्यानच गेले फिरायला अन् दोघं... पांडवकडा धबधब्यावर मोठी
खरंच काँग्रेसचा आमदार शिंदेंच्या संपर्कात? 20 कोटींची ऑफर...खुद्द नेता
