AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

थेट धाब्यावर मिळाल्या 2 ईव्हीएम मशिन, मोठा गोंधळ, निवडणूक अधिकाऱ्यांसह…

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची मतदान प्रक्रिया पार पडली. उद्या निकाल असेल. मात्र, त्यापूर्वी सोलापूरमध्ये मोठा गोंधळ उडाल्याचे बघायला मिळाले. ईव्हीएम मशिन चक्क धाब्यावर मिळाली.

थेट धाब्यावर मिळाल्या 2 ईव्हीएम मशिन, मोठा गोंधळ, निवडणूक अधिकाऱ्यांसह...
EVM machines
| Updated on: Feb 08, 2026 | 8:58 AM
Share

राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुका झाल्या असून या निवडणुकीत भाजपा हा सर्वात मोठा पक्ष ठरला. भाजपाने धमाकेदार कामगिरी या निवडणुकीत केली. भाजपानंतर शिवसेना शिंदे गट दुसऱ्या नंबरचा मोठा पक्ष महापालिकेच्या निवडणुकीत ठरला. राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुकीचे मतदान काल झाले. सर्वच राजकीय पक्षांकडून या निवडणुकीची जोरदार तयारी करण्यात आली. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आयोजित सभा रद्द केल्या. अजित पवार यांचे निधन झाल्याने म्हणाव्या तसा प्रचार कोणत्याच राजकीय पक्षांनी केला नाही. मुंबईहून बारामतीला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या प्रचारसभेसाठी येत असतानाच अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला, ज्यामुळे त्यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला.

काल अनेक जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची मतदान प्रक्रिया पार पडली. उद्या म्हणजेच 9 जानेवारी 2026 रोजी निकाल आहे. मात्र, यादरम्यान एक धक्कादायक प्रकार पुढे आला. सोलापुरातील मोहोळमध्ये ईव्हीएम मशीन धाब्यावर सापडल्याचा हैराण करणारा प्रकार पुढे आला. एका धाब्यावर ईव्हीएम मशीन सापडल्याने राष्ट्रवादीचे उमेश पाटील आक्रमक झाले.

या घटनेनंतर घटनास्थळी निवडणूक अधिकारी सीमा होळकर तसेच पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्यांनी दोन्ही ईव्हीएम मशिन्स ताब्यात घेतल्या.  त्या दोन ईव्हीएम मशीन अतिरिक्त असून त्यावर कोणतेही मतदान झाले नसल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. मात्र, ईव्हीएम मशीन चक्क धाब्यावर मिळाल्याने खळबळ उडाली.

दरम्यान उमेश पाटलांच्या आक्षेपानंतर दोन्ही मशीन अधिकाऱ्यांनी ताब्यात घेत रीतसर पंचनामा करुन स्ट्रॉंगरूममध्ये ठेवण्यात आल्या. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांच्या समोर पंचनामा करत या मशिन्स ठेवण्यात आल्यात. यादरम्यान अनेक लोक देखील समजले होते. काल मतदानावेळी अनेक मतदार केंद्रात ईव्हीएम मशिन बंद पडल्याचे बघायला मिळाले. यामुळे काही काळ गोंधळाचे वातावरण होते. जिल्हा परिषद आणि पंचायत समितींवर कोण राज करणार हे उद्या स्पष्ट होईल.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?