लग्नाच्या 6 महिन्यांनी ‘बिग बॉस’ फेम गायिकेनं दिली गुड न्यूज, बेबी बंप फ्लॉन्ट करत म्हणाली…
Bigg Boss Fame Singer : बिग बॉस फेम ढिंचॅक पूजानं सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत प्रेग्नन्सीची घोषणा केली आहे.

‘सेल्फी मैंने ले ली आज’ या व्हायरल गाण्यामुळे प्रसिद्धी मिळवलेली गायिका आणि ‘बिग बॉस ११’ ची स्पर्धक ढिंचक पूजा हिनं, पती युवानसोबत लग्न झाल्यानंतर सहा महिन्यांनी प्रेग्नन्सीची घोषणा केली आहे. पूजानं सोशल मीडियावर एका व्हिडिओद्वारे ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली. पूजानं सांगितलं की, तिला लवकरच मुलगा होणार आहे. पूजा जैननं शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये ती आपलं बेबी बंप दाखवताना दिसत आहे. पूजाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहत्यांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत.
ढिंचॅक पूजाचा बेबी शॉवर व्हिडिओ
या व्हिडिओमध्ये पूजाच्या बेबी शॉवरमधील काही सुंदर क्षणही दिसत आहेत, ज्यामध्ये पूजानं गुलाबी रंगाचा पोशाख परिधान केला आहे. एका क्लिपमध्ये, तिनं ‘बेबी बॉय’ असं लिहिलेला फुगा धरलेला दिसत आहे. दुसऱ्या फोटोमध्ये, तिनं बेबी बंप दाखवत पोज दिली आहे आणि ‘आय लव्ह माय मम्मी’ असं लिहिलेलंं स्टिकर हातात धरलं आहे.
View this post on Instagram
पूजानं गायक युवानशी लग्न केलं
ढिंचॅक पूजानं गायक युवानसोबतच्या तिच्या लग्नाची घोषणा केल्यानंतर काही महिन्यांतच ही प्रेग्नन्सीची घोषणा केली आहे. तिनं यावर्षी मे महिन्यात सोशल मीडियावर ही बातमी शेअर केली होती, पण त्यावेळी अनेकांना वाटलं होतं की, हे तिच्या आगामी म्युझिक व्हिडिओच्या प्रमोशनचा एक भाग आहे. पण, पूजानं नंतर स्पष्ट केलं की तिचं खरोखरच लग्न झालं आहे आणि याचा कोणत्याही म्युजिक प्रोजेक्टशी काहीही संबंध नाही.
हिंदुस्तान टाइम्सशी बोलताना पूजा म्हणाली, ‘माझं खरोखरच लग्न झालं आहे. यात काहीही खोटं नाही. हा म्युझिक व्हिडिओ नाही; माझं खरोखरच लग्न झालं आहे. आमचं लग्न होऊन आता काही काळ लोटला आहे. मी युवानला ऑनलाइन भेटले आणि काही काळ डेटिंग केल्यानंतर, आम्ही माझ्या पालकांच्या संमतीने लग्न केलं. आम्ही आमच्या नव्या आयुष्याची सुरुवात अत्यंत खाजगी पद्धतीनं केली.’
