AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एमआयएमला राज्यात मोठा धक्का, पक्षाच्या टॉपच्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी समोर येत आहे, राज्यात एमआयएमला मोठा धक्का बसला आहे. एमआयएमच्या बड्या नेत्यानं तडकाफडकी राजीनामा दिला आहे. याचा मोठा फटका पक्षाला बसण्याची शक्यता आहे.

एमआयएमला राज्यात मोठा धक्का, पक्षाच्या टॉपच्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा
एमआयएमला धक्का Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Dec 28, 2025 | 6:26 PM
Share

राज्यात महापालिका निवडणुकीचं बिगूल वाजलं आहे.  महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, त्यातच आता मोठी बातमी समोर येत आहे. एमआयएमला राज्यात मोठा धक्का बसला आहे. एमआयएमचे प्रदेश कार्याध्यक्ष आणि सोलापूरचे शहराध्यक्ष फारूक शाब्दि यांनी पक्षाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. हा राज्यात एमआयएमला मोठा धक्का मानला जात आहे. एमआयएमचे नेते एम्तियाज जलील यांच्या नंतर फारुख शाब्दि हे एमआयएमचे राज्यातील दुसरे मोठे नेते आहेत. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्यामुळे पक्षाला मोठं खिंडार पडलं आहे.  सोलापूर शहर मध्य विधानसभेतून फारुख शाब्दि यांनी दोन वेळा निवडणूक लढवली होती, दोन्ही वेळेस फारुख शाब्दि हे दुसऱ्या क्रमांकावर होते.

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा एमआयएमसाठी मोठा धक्का मानला जात आहे. फारुख शाब्दि यांच्याकडे सोलापूर शहराध्यक्ष, मुंबई शहराध्यक्ष आणि प्रदेश कार्याध्यक्ष  पदाची जबाबदारी होती.  मात्र पक्षात सुरु असलेल्या अंतर्गत राजकारणमुळे शाब्दि यांनी पक्षाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर येत आहे. ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर हा एमआयएमला मोठा धक्का मानला जात आहे.

काँग्रेसला धक्का 

दरम्यान दुसरीकडे एमआएमने सोलापुरात काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. काँग्रेसने सोलापूर महापालिका निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली, ज्या उमेदवाराला उमेदवारी जाहीर झाली त्यानेच एमआयएममध्ये प्रवेश केला आहे. सोलापुरातील प्रभाग 16 च्या काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार आणि माजी नगरसेविका फिरदोस पटेल यांनी एमआयएममध्ये प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे फिरदोस पटेल यांनी एमआयएमचे कार्याध्यक्ष फारुख शाब्दि यांच्या उपस्थितीमध्ये एमआयएममध्ये प्रवेश केला, आणि त्यानंतर शाब्दि यांनीच राजीनामा दिला आहे.  शाब्दि यांच्या राजीनाम्यामुळे एमआयएमला मोठा धक्का बसला आहे.

पक्षांतरला वेग 

दरम्यान दुसरीकडे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतराला देखील जोरदार वेग आला आहे. सध्या महायुतीमध्ये वेगवेगळ्या पक्षांमधून पक्षांतर होत आहेत. भाजपमध्ये जोरदार इनकमिंग सुरू असून, त्यामुळे निष्ठावंत नाराज असल्याचं चित्र पहायला मिळत  आहे. येत्या 15 जानेवारी रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे.

Follow Us
राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
Rahul Gandhi : निवडणूक आयोगाला भेटल्याशिवाय हटणार नाही...; राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? शिवसेना
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट; घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? बागची यांचा थेट सवाल
भीमनवारांनी राजीनामा दिला? पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
Rohit Pawar : भीमनवारांनी राजीनामा दिला? रोहित पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री...
Eknath Khadse : ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री म्हणत, एकनाथ खडसेंचा पलटवार
स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? दानवेंचा रोख कुणावर?
Ambadas Danve : स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? अंबादास दानवेंचा रोख कुणावर? म्हणाले...
ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमक
Sunil Prabhu : ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमका कोणाला इशारा
तिरडीवर चिरडलेली स्वप्नं, हातात घोषणाबाजीचे फलक; MPSC विद्यार्थ्यांचं
MPSC Protest Pune : तिरडीवर चिरडलेली स्वप्नं, हातात घोषणाबाजीचे फलक; तिरडी यात्रेतून MPSC विद्यार्थ्यांचं पुण्यात सरकारविरोधात जोरदार आंदोलन
इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण; VIDEO सोशल मीडियावर व्हायरल
Viral Video : इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण; शिरूरच्या कार्यक्रमातील VIDEO सोशल मीडियावर व्हायरल, नेमकं काय घडलं?
महायुतीतच फ्रेंडली फाईटची शक्यता; चिवटे विरुद्ध गावडे, माघार कोण घेणार
Mahayuti : महायुतीतच फ्रेंडली फाईटची शक्यता; पुणे शिक्षक मतदारसंघात चिवटे विरुद्ध गावडे, माघार कोण घेणार?
महाराष्ट्रात १६ ऑक्टोबरपासून तब्बल एवढे टक्के पाणीकपात
Drought : महाराष्ट्रात दुष्काळाचं संकट गडद; १६ ऑक्टोबरपासून तब्बल एवढे टक्के पाणीकपात; सरकारचा मोठा निर्णय काय?