AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs NZ: आज रात्री आम्ही…! अंतिम सामन्यातील पराभवानंतर न्यूझीलंड मिचेल सँटनरने केलं मोठं विधान

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या अंतिम सामन्यापूर्वी न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनरने वल्गना केली होती. पण अंतिम फेरीत त्याचं तोंड टीम इंडियाने बंद केलं. अंतिम सामन्यातील पराभवानंतर त्याने मोठं विधान केलं आहे. टीम इंडियाचं कौतुक करताना म्हणाला की...

IND vs NZ: आज रात्री आम्ही...! अंतिम सामन्यातील पराभवानंतर न्यूझीलंड मिचेल सँटनरने केलं मोठं विधान
IND vs NZ: आज रात्री आम्ही...! अंतिम सामन्यातील पराभवानंतर न्यूझीलंड मिचेल सँटनरने केलं मोठं विधान Image Credit source: New Zealand cricket Twitter
| Updated on: Mar 09, 2026 | 1:10 AM
Share

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या अंतिम सामन्यापूर्वी मिचेल सँटनरने पॅट कमिन्ससारखी वल्गना करून भारताला डिवचलं होतं. इतकंच काय तर अहमदाबाद स्टेडियमधील प्रेक्षकांना गप्प करू असंही म्हणाला होता. तसेच खेळपट्टीचे फोटो काढून पॅट कमिन्सची स्टाईलही मारली होती. नाणेफेकीचा कौलही सँटनरच्या बाजूने लागला. पण टीम इंडियाने सँटनरच्या या वक्तव्याची सर्व हवाच काढून टाकली. नाणेफेकीचा न्यूझीलंडने जिंकला असला तरी या सामन्यावर पूर्णपणे भारताची पकड दिसली. संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा यांनी चांगली सुरूवात करून दिली. इशान किशनने त्यात आणखी भर घातली. शिवम दुबेने शेवटी फटकेबाजी करून न्यूझीलंडच्या विजयाची हवा काढून टाकली. 255 धावांचा पाठलाग करणं काही सोपी गोष्ट नाही हे कळून चुकलं होतं. त्यामुळे भारताचा विजय हा पहिल्या डावातच निश्चित झाला होता. हा सामना भारताने 96 धावांनी जिंकला. जेतेपद हुकल्यानंतर मिचेल सँटनरने आपल्या भावना व्यक्त केल्या.

न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनर म्हणाला की, “अंतिम फेरीपर्यंत पोहोचल्याबद्दल मला माझ्या सहकाऱ्यांचा अभिमान आहे. तुम्हाला माहिती आहेच, संपूर्ण स्पर्धेत आमच्यासमोर किती आव्हाने होती, पण आम्ही प्रत्येक आव्हानावर तितक्याच ताकदीने मात केली आणि चांगले खेळलो. तआज रात्री एका चांगल्या संघाने आणि या मोठ्या प्रेक्षकांसमोर आमच्यासमोर एक उत्तम खेळ दाखवला. तरीही मला माझ्या मुलांचा अभिमान आहे.” या सामन्यात न्यूझीलंडचा कुठे नव्हता. खऱ्या अर्थाने हा सामना एकतर्फी झाला असंच म्हणावं लागेल.

मिचेल सँटनर पुढे म्हणाला की, “हो, मला वाटते की प्रत्येक टप्प्यावर वेगवेगळ्या खेळाडूंनी जबाबदारी घेतली. मला वाटते की आम्हाला प्रत्येक टप्प्यावर आव्हानांचा सामना करावा लागला आणि पुढे जाणे नक्कीच चांगले होते. आम्ही सुपर 8 मध्ये आणि नंतर उपांत्य फेरीत खरोखर चांगले खेळलो, पण मला वाटते की आज रात्री आम्ही कमी पडलो.” भारताने सलग दुसऱ्यांदा टी20 वर्ल्डकप जिंकला आहे. तर टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासात तिसरं जेतेपद आहे.

Follow Us
एकनाथ शिंदेंचं लंडनमधील भाषण, वडापाव खातानाचा Video; राऊतांची जोरदार..
एकनाथ शिंदेंचं लंडनमधील भाषण, वडापाव खातानाचा Video; राऊतांची जोरदार टीका
गणेशोत्सवात अमित शहांचा मुंबई दौरा, बड्या नेत्याने घेतला तीव्र आक्षेप
गणेशोत्सवात अमित शहांचा मुंबई दौरा; बड्या नेत्याने घेतला तीव्र आक्षेप, म्हणाले पोलिसांना ताण...
बुलढाण्यात भाजपला मोठा धक्का! बड्या नेत्यासह 12 जणांवर गंभीर गुन्हा...
बुलढाण्यात भाजपला मोठा धक्का! बड्या नेत्यासह 12 जणांवर गंभीर गुन्हा दाखल, महिलेला...
दिशा सालियन प्रकरणात मोठे वळण, वकिलांच्या विधानाने बड्या नेत्याच्या...
दिशा सालियन प्रकरणात मोठे वळण, वकिलांच्या विधानाने बड्या नेत्याच्या अडचणी वाढल्या?
सोलापूरमध्ये लक्ष्मण हाके यांच्याशी तरुणांची झटापट, तिघांविरोधात...
सोलापूरमध्ये लक्ष्मण हाके यांच्याशी तरुणांची झटापट, तिघांविरोधात तक्रार
कितीही केलं तरी तुम्ही तरुण होणार नाही, ज्येष्ठच... गुलाबराव पाटील
कितीही केलं तरी तुम्ही तरुण होणार नाही, ज्येष्ठ... गुलाबराव पाटील अन् महाजनांमध्ये वेगळीचं जुगलबंदी
मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मोठी अपडेट, विशेष मकोका न्यायालय...
मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मोठी अपडेट, विशेष मकोका न्यायालयाचा मोठा निर्णय
दिल्लीत हालचालींना वेग; तब्बल 7 वर्षांनंतर शी जिनपिंग यांचा हा भारत...
दिल्लीत हालचालींना वेग; तब्बल 7 वर्षांनंतर शी जिनपिंग यांचा हा भारत दौरा, CM फडणवीस देखील ब्रिक्स परिषदेसाठी रवाना
माधुरी हत्तीण नांदणी मठात परतली, हजारो नागरिकांनी उत्साहात केले...
माधुरी हत्तीण नांदणी मठात परतली, हजारो नागरिकांनी उत्साहात केले स्वागत
मोठी बातमी! काँग्रेसचे माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचे निधन
मोठी बातमी! काँग्रेसचे माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचे निधन; आणीबाणीच्या काळात...