GK: IPL मध्ये खेळण्यास दिला नकार, तरीही खेळाडूला मिळतो पैसा? की बसतो दणका?
IPL Auction Amount: इंडियन प्रीमियम लीगमध्ये खेळाडूंची कोट्यवधींची बोली लागते. पण एकदा खेळाडूची विक्री झाली आणि त्याने खेळण्यास नकार दिल्यावर त्याला लिलावाची सर्व रक्कम मिळते का? काय आहे याविषयीचा नियम, वाचून तुम्हाला बसेल मोठा धक्का...

IPL Auction Amount: IPL च्या लिलावात कोट्यवधींची बोली लागते. खेळाडू रात्रीतून स्टार होतात. आयपीएलच्या माध्यमातून क्रिकेटचा थरार अनुभवायला मिळतो. खेळाडू श्रीमंत होतात. विजेता संघ मालामाल होतो. हे मोठे अर्थचक्र आहे. अशावेळी एखाद्या खेळाडूने लिलावानंतर अचानक खेळण्यास नकार दिला तर? मग त्याला लिलावाची रक्कम परत मिळते का? का त्याला दट्ट्या मिळतो. त्याचे नुकसान होते. काय आहे याविषयीचा नियम? तुम्हाला माहिती आहे का?
1. इंडियन प्रीमियर लीग हे पूर्णपणे BCCI संचालित आहे. जेव्हा एखादा खेळाडू IPL लिलावासाठी त्याचे नाव देतो, तेव्हा त्याला नियम आणि अटींचा स्वीकार करावा लागतो. लिलावात विक्री झाल्यानंतर आणि फ्रँचाईजने त्यांच्याशी करार केल्यानंतर ते बांधले जातात. त्यामुळे मग खेळाडूवर खेळण्यासाठी तयार राहाणे आणि मैदानात उतरणे ही मोठी जबाबदार असते.
2.जेव्हा खेळाडू कोणत्याही ठोस अथवा वैध कारणाशिवाय IPL खेळण्यास नकार देतो, तेव्हा त्याला निलामीची पूर्ण रक्कम देण्यात येत नाही. IPL मध्ये ‘नो प्ले, नो पे’ म्हणजे खेळणार नाही तर मोबदला नाही हा नियम लागू होतो. याचा अर्थ खेळाडू मैदानावर उतरला नाही तर त्याला पैसे मागण्याचा अधिकार नसतो.
3.BCCI च्या नियमानुसार, लिलावात एकदा विक्री झाल्यावर नाव परत घेणे नियमांचे गंभीर उल्लंघन मानल्या जाते. अशा प्रकरणात मग त्या खेळाडूवर पुढील दोन IPL हंगाम आणि लिलाव प्रक्रियेसाठी त्याच्यावर प्रतिबंध घातल्या जाऊ शकतो. हा प्रतिबंध एक शिक्षाच नाही तर एक स्पष्ट संदेश आहे.
4.पण काही प्रकरणात खेळाडूंना शिक्षा नाही तर सवलतही देण्यात आली आहे. जेव्हा खेळाडूला मोठी इजा होते. त्याला दुखापत होते अथवा त्याला राष्ट्रीय संघात खेळणे गरजेचे असते अशावेळी आयपीएलमधून बाहेर पडण्यास त्याला सवलत देण्यात येते. अर्थात त्यासंबंधीचे सज्जड पुरावे त्याला सादर करावे लागतात.
5.IPL सामन्यांसाठी प्रत्येक टीम एक रणनीती आखते. पण जेव्हा खेळाडू मोठी रक्कम घेऊन खेळण्यास नकार देतो. तेव्हा मग टीम आणि फ्रँचाईजचे मोठे नुकसान होते. BCCI च्या कडक नियम नुकसान टाळण्यासाठीच तयार करण्यात आले आहे. त्यामुळे टीमचे नुकसान होत नाही. पण अनेकदा काही कारणांसाठी खेळाडूंना या नियमातून सवलत देण्यात आल्याचेही दिसले आहे. आता लवकरच आयपीएल 2026 चा हंगाम येणार आहे. त्यापूर्वीच बांगलादेशाच्या खेळाडूवरून वाद पेटलेला आहे.
