Vaibhav Suryavanshi: आरारारा खतरनाक, वैभव सूर्यवंशीने आतापर्यंत ठोकले इतके षटकार, आकडा वाचून तुम्ही सुद्धा फॅन व्हाल
Vaibhav Suryavanshi has hit Six: अवघ्या 14 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने IPL च नाहीतर विजय हजारे करंडक आणि इतर आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये तडाखेबंद खेळी खेळली. त्याने गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. त्याच्या षटकारांची मोठी चर्चा होते. त्याने याकाळात इतक्या वेळा चेंडू हा मैदानाबाहेर टोलावला आहे. त्याच्या उत्तुंग षटकारांची सध्या क्रिकेट चाहत्यांमध्ये मोठी चर्चा सुरू आहे.

Vaibhav Suryavanshi has hit Six: भारतीय क्रिकेट विश्वातील सर्वात खतरनाक फलंदाज वैभव सूर्यवंशीची दखल जागतिक पातळीवर घेण्यात आली आहे. काही आंतरराष्ट्रीय सामन्यात त्याच्या दणकेबाज फलंदाजीने दिग्गज क्रिकेटर्स सु्द्धा प्रभावित झाले आहे. भारताला एक स्फोटक फलंदाज मिळल्याची चर्चा आहे. तर त्याच्या अजून एका रेकॉर्डची चर्चा सुरू आहे. वैभवने तडाखेबंद खेळी करत अनेकदा चेंडू मैदानाबाहेर टोलावले आहे. ESPN Info च्या आकडेवारीनुसार वैभव सूर्यवंशीने अल्पवधीतच उत्तुंग कामगिरी केली आहे. त्याने इतक्यावेळा उत्तुंग षटकार ठोकले आहेत.
फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये इतके षटकार
फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये वैभव सूर्यवंशीने आतापर्यंत 8 सामने खेळले आहेत. 12 डावांमध्ये त्याने 207 धावा केल्या. अर्थात या फॉर्म्यटमध्ये त्याचा खेळ संयमित होता. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये वैभवने आतापर्यंत 6 षटकार लगावले. तर त्याने फलंदाजी करताना धावपट्टीवर टिकून राहण्याचे कसब आत्मसात केल्याचे दिसते. त्याला दीर्घकाळ फलंदाजी करण्याची सवय हळू हळू लागत असल्याचे दिसते.
लिस्ट ए क्रिकेटमध्ये आक्रमक
लिस्ट ए क्रिकेटमध्ये वैभव सूर्यंवशीने तुफान खेळी खेळली. त्याने 8 सामन्यातील 8 डावांमध्ये 353 धावा चोपल्या. या सामन्यात त्याच्या नावावर 23 गगनचुंबी षटकारांची नोंद आहे. वैभव मर्यादित षटकांमध्ये कमाल करून दाखवू शकतो. हे त्याने सिद्ध केले. तो गोलंदाजांच्या दबावात न येता, गोलंदाजांचा घाम काढतो हे त्याच्या कामगिरीवरून समो आले.
टी20 क्रिकेटमध्ये षटकारांचा पाऊस
टी20 क्रिकेटमध्ये वैभव सूर्यवंशीने सर्वात दमदार कामगिरी केली. त्याने आतापर्यंत 18 टी20 सामन्यातील 18 डावांमध्ये 701 धावा काढल्या. यामध्ये त्याने रेकॉर्ड ब्रेक 62 षटकार ठोकले. त्याच्या या कामगिरीवरून तो नॅचरल पॉवर हिटर असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे तो कोणत्या दबावात सरस कामगिरी करून दाखवतो हे स्पष्ट झाले आहे.
IPL मध्ये 24 षटकार
IPL मध्ये राजस्थान रॉयल्स (RR) संघाकडून वैभव सूर्यवंशी खेळला. त्याने 7 सामन्यांमध्ये 252 धावा काढल्या. त्यात त्याने एक जोरदार शतक ठोकले. IPL मध्ये वैभवने आतापर्यंत 24 षटकार ठोकले. या सर्व फॉर्म्यटमध्ये वैभव सूर्यवंशीने आतापर्यंत 115 हून अधिक षटकार ठोकले. त्यामुळे त्याचे भविष्य उज्ज्वल असल्याचे समोर येत आहे.
