AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kolhapur Travels Accident | कोल्हापुरात चोरीची ट्रॅव्हल्स शिरोली टोल नाक्यावर आदळली; मोठे नुकसान, नेमकं काय घडलं?

Kolhapur Travels Accident | कोल्हापुरात चोरीची ट्रॅव्हल्स शिरोली टोल नाक्यावर आदळली; मोठे नुकसान, नेमकं काय घडलं?

| Updated on: Feb 26, 2026 | 3:52 PM
Share

कोल्हापूर शहरात अपघातांचे सत्र सुरू असतानाच शिरोली टोल नाक्यावर मध्यरात्री भीषण अपघात घडला. दुरुस्तीसाठी गॅरेजमध्ये ठेवण्यात आलेली ‘पारीख’ आणि ‘शंभो टूर्स अँड ट्रॅव्हल्स’ची बस अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे.

कोल्हापूर शहरात अपघातांचे सत्र सुरू असतानाच शिरोली टोल नाक्यावर मध्यरात्री भीषण अपघात घडला. दुरुस्तीसाठी गॅरेजमध्ये ठेवण्यात आलेली ‘पारीख’ आणि ‘शंभो टूर्स अँड ट्रॅव्हल्स’ची बस अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित ट्रॅव्हल्स दुरुस्तीकरिता गॅरेजमध्ये ठेवण्यात आली होती. मात्र, मध्यरात्री अज्ञात व्यक्तींनी ही बस चोरून कोल्हापूर शहराच्या दिशेने नेली. याची माहिती मिळताच गॅरेज मालकाने तत्काळ पाठलाग सुरू केला. पाठलाग सुरू असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने बस, बंद असलेल्या शिरोली टोल नाक्यावरील कठड्यावर जोरात आदळली. या धडकेत टोल नाक्याच्या कठड्याचे नुकसान झाले असून बसचा पूर्णपणे चक्काचूर झाला आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झालेली नाही. चोरी करून पळवून नेत असतानाच हा अपघात घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

Published on: Feb 26, 2026 03:52 PM

Follow Us
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या

Commonwealth Games 2026 स्पर्धा 23 जुलैपासून, 74 देश रणांगणात; भारताचे 126 खेळाडू करणार स्पर्धा.

Commonwealth Games 2026 स्पर्धा 23 जुलैपासून, 74 देश रणांगणात; भारताचे 126 खेळाडू करणार स्पर्धा