आशिया कप ट्रॉफी लपवली कुठं? प्रश्न विचारताच ट्रॉफी चोर मोहसीन नकवी यांनी केलं असं काही की…
Mohsin Naqvi Asia Cup Trophy: आशिया कप 2025 ची भारतीय संघाने जिंकलेली ट्रॉफी अद्यापही भारताला देण्यात आलेली नाही. पाकिस्तानचा मंत्री आणि ट्रॉफी चोर मोहसीन नकवी याला याविषयी प्रश्न विचारला असतो तो गडबडला आणि मग त्याने अशी प्रतिक्रिया दिली. त्याची क्रिकेट विश्वात एकच चर्चा होत आहे.

Mohsin Naqvi Asia Cup Trophy: आशिया कप 2025 वर टीम इंडियाने मोहोर उमटवली. आशिया कप भारताने जिंकला असला तरी ट्रॉफी अद्याप टीम इंडियाला मिळालेली नाही. पाकिस्तानचा मंत्री आणि ट्रॉफी चोर मोहसीन नकवी याच्या हातून ट्रॉफी घेण्यास भारतीय संघाने नकार दिला होता. तेव्हापासून ही ट्रॉफी त्याच्याकडेच आहे. आता या घटनेला तीन महिने उलटून गेले आहे. नकवी हा एशियन क्रिकेट परिषदेचा अध्यक्ष आहे. त्यामुळे ही ट्रॉफी त्याने त्याच्याकडेच दडवून ठेवली आहे. नकवी हा पाकिस्तानी क्रिकेट मंडळाचा (PCB) चा अध्यक्ष पण आहे. गेल्या काही दिवसांपासून नकवीला ही ट्रॉफी कुठे ठेवली याविषयीचा प्रश्न विचारल्या जात आहे. पण तो नेहमी उत्तर देण्यास टाळाटाळ करतो. पण त्याला पाकिस्तानच्या एका कार्यक्रमातच हा प्रश्न विचारण्यात आल्यावर त्याची प्रतिक्रिया पाहण्यासारखी होती. पाकिस्तानमधूनही नकवीच्या या वागणुकीवर टीका होत आहे. भारतीय संघाची जी काही भूमिका असेलही पण नकवींनी तशीच चूक करणे मूर्खपणाचे असल्याची टीका त्याच्यावर होत आहे.
काय दिले नकवींनी उत्तर
आशिया कप 2025 ट्रॉफीविषयी वाद सुरु असतानाच याविषयी कराचीतील एका वाहिनीच्या चर्चेदरम्यान नकवींना हाच प्रश्न विचारण्यात आला. पत्रकारांनी मोहसीन नकवी यांना आशिया कप ट्रॉफी कुठं लपवली आहे आणि ती भारतीय संघाला देणार का असा सवाल केला. त्यावर नकवी थोडे गडबडले. पण मग त्यांनी यावेळी थेट उत्तर दिलं. “ट्रॉफी जिथं पण आहे, ती सुरक्षित आहे”, असं उत्तर त्यांनी दिलं. पण ट्रॉफी भारताला कधी देणार या प्रश्नावर त्यांचं मौन दिसून आले. जागतिक क्रिकेट परिषदेच्या (ICC) बैठकीत आशिया कप ट्रॉफीच्या मुद्दावर कोणताही चर्चा झाली नसल्याचे समोर आले आहे. भारतीय क्रिकेट बोर्ड, BCCI ने सुद्धा या बैठकीत आशिया कप विषयी कोणतीही विचारणा केली नसल्याचे समोर येत आहे.
याविषयीच्या वृत्तानुसार, ICC बोर्ड बैठकीत आशिया कप ट्रॉफीविषयी कोणताही मुद्दा नव्हता. त्यामुळे त्यावर कोणतीही चर्चा झाली नाही. भारतीय संघाला ही ट्रॉफी कधी देण्यात येणार याचे उत्तर अर्थातच मोहसीन नकवी हेच देऊ शकतील. पण त्यांनी ही ट्रॉफी सुरक्षित असल्याचे सांगितले आहे. बीसीसीआयने ही ट्रॉफी त्यांच्याकडे जमा होणार असे अनेकदा सांगितले. पण अद्यापही बीसीसीआयकडे ही ट्रॉफी आली नाही. तर दुबईत आशिया क्रिकेट परिषदेचे मोठे कार्यालय आहे. तिथे ही ट्ऱॉफी ठेवल्याचा दावा करण्यात येतो. या कार्यालयाची किल्ली, चाबी ही नकवींकडे असल्याचे समजते.
काय घडलं होतं नाट्य?
28 सप्टेंबर रोजी दुबईमध्ये आशिया कप 2025 चा अंतिम सामना भारताने जिंकला. आशिया क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष मोहसीन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारण्यास भारतीय संघाने नकार दिला. कारण ते पाकिस्तान सरकारमध्ये मंत्री आहेत. तर पहलगाम हल्ल्यानंतर त्यांनी भारतविरोधी अनेक वक्तव्य सुद्धा केली आहेत. त्यामुळे टीम इंडियाचा कर्णधार आणि इतर खेळाडूंनी ही ट्रॉफी नकवी यांच्या हातून न स्वीकारण्याची भूमिका घेतली. तेव्हापासून ही ट्रॉफी नकवी यांच्यात ताब्यात आहे.
