AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दादांजवळ जाऊ दिलं नाही आता वहिनी…, राष्ट्रवादीत नेमकं चाललंय काय? माईक चालू राहिला अन् सर्वच समोर आलं

सुनेत्रा पवार यांच्या पत्रकार परिषदेपूर्वी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यांना पत्रकारांच्या प्रश्नांपासून वाचवण्यासाठी केलेल्या गुप्त नियोजनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

दादांजवळ जाऊ दिलं नाही आता वहिनी..., राष्ट्रवादीत नेमकं चाललंय काय? माईक चालू राहिला अन् सर्वच समोर आलं
Sunetra Pawar PC
| Updated on: Feb 27, 2026 | 7:47 AM
Share

राज्याचे दिवगंत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राज्यात मोठी उलथापालथ झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष कोण होणार, याची चर्चा रंगलेली असतानाच दुसरीकडे पक्षातील अंतर्गत नियोजनावरून मोठी चर्चा रंगली आहे. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी निवड झाल्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत एक विचित्र प्रकार पाहायला मिळाला. ही परिषद अधिकृतपणे सुरू होण्यापूर्वीच प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि आमदार सरोज अहिरे यांच्यातील संवाद रेकॉर्ड झाला आणि तो सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल झाला आहे.

राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्षपदी निवड झाल्यानंतर एका पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. ही पत्रकार परिषद सुरू होण्यापूर्वी काही नेत्यांना माईक सुरु असल्याची कल्पना नव्हती. यावेळी पक्षातील काही नेते, आमदार हे आपापसात कुजबूज करताना पाहायला मिळाले. यावेळी सुनेत्रा पवारांना पत्रकारांच्या प्रश्नांपासून कसे वाचवायचे, यावर चर्चा सुरु असल्याचे पाहायला मिळाले.

वहिनींची मनस्थिती नाहीये, असे सांगू

यावेळी आमदार सरोज अहिरे यांनी कार्यकर्त्यांना बाजूला करण्यावरून भाष्य केले. दादांजवळ कधी जाऊ देण्याची संधी माणसांनी दिली नाही, किमान वहिनींजवळ तरी जाऊ द्या, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. यानंतर काही ज्येष्ठ नेत्यांनी सुनेत्रा पवारांना सावध राहण्याचा सल्ला दिला. तुम्ही प्रश्न घेऊ नका, तुमचं बोलून झालं की लगेच उठा. पत्रकार प्रेशराईज करतील, तेव्हा आम्ही तुम्हाला उठवू, असे मार्गदर्शन नेत्यांनी केले. इतकेच नाही तर, वहिनींची मनस्थिती नाहीये, असे सांगून वेळ मारून नेऊ, अशा पद्धतीने नियोजनही यावेळी करण्यात आले.

या संवादादरम्यान नेत्यांनी सुनेत्रा पवारांना स्पष्ट सूचना दिल्या होत्या की, “तुम्ही फक्त तुमचं स्टेटमेंट करा, बाकी आम्ही बघून घेऊ. पत्रकार जेव्हा प्रेशराईज करतील, तेव्हा तुम्ही तिथून उठा, आम्ही बाजूलाच थांबतो.” असे सांगण्यात आले होते.

तुम्ही आता निघा

विशेष म्हणजे नेत्यांनी हे प्लॅनिंग पत्रकार परिषद सुरू झाल्यावर तंतोतंत अमलात आणले. सुनेत्रा पवार या पत्रकारांसमोर येऊन बसल्या. पण त्यांनी काहीही वक्तव्य केले नाही. यानंतर काही मिनिटांनी प्रफुल्ल पटेल यांनी त्यांना तुम्ही आता निघा असे खुणावले. यानंतर सुनेत्रा पवार तिथून निघून गेल्या. यानंतर सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. यामुळे ही पत्रकार परिषद केवळ नावापुरतीच होती का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

सुनेत्रा पवार यांच्या पत्रकार परिषदेपूर्वी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यात झालेली ‘गुपित’ चर्चा माईकमध्ये रेकॉर्ड झाली असून, पत्रकारांचे प्रश्न टाळण्यासाठी नेत्यांनी आखलेली रणनीती उघड झाली आहे.

Follow Us
नारी शक्ती विधेयकावर लोकसभेत घमासान; अरविंद सावंतांचा सरकारला सवाल
नारी शक्ती विधेयकावर लोकसभेत घमासान; अरविंद सावंतांचा सरकारला सवाल.
महिला आरक्षणावरून कोल्हेंचा हल्लाबोल; सत्ताधाऱ्यांना अप्रत्यक्ष टोला
महिला आरक्षणावरून कोल्हेंचा हल्लाबोल; सत्ताधाऱ्यांना अप्रत्यक्ष टोला.
विधेयकाचं क्रेडिट तुम्ही घ्या, आम्ही ब्लँकचेक... मोदी असं का म्हणाले?
विधेयकाचं क्रेडिट तुम्ही घ्या, आम्ही ब्लँकचेक... मोदी असं का म्हणाले?.
महिलांच्या अधिकारांना विरोध करणाऱ्यांना महिलांनीच उत्तर दिलं – मोदी
महिलांच्या अधिकारांना विरोध करणाऱ्यांना महिलांनीच उत्तर दिलं – मोदी.
पोटनिवडणुकीत नवा ट्विस्ट; सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपदाच्या रेसमध्ये?
पोटनिवडणुकीत नवा ट्विस्ट; सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपदाच्या रेसमध्ये?.
विधानपरिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर; 9 जागांसाठी 12 मे रोजी मतदान
विधानपरिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर; 9 जागांसाठी 12 मे रोजी मतदान.
आयटी कंपनीतील धर्मांतराचा उद्रेक... सकल हिंदू समाजाचा महाएल्गार
आयटी कंपनीतील धर्मांतराचा उद्रेक... सकल हिंदू समाजाचा महाएल्गार.
नारी शक्ती की भाजपा शक्ती?; संजय राऊतांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल
नारी शक्ती की भाजपा शक्ती?; संजय राऊतांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल.
काहीच आठवेना... माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीची प्रकृती चिं
काहीच आठवेना... माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीची प्रकृती चिं.
महापालिकेत आत्म्यांचा वावर?, मंत्र्यांचं धक्कादायक विधान
महापालिकेत आत्म्यांचा वावर?, मंत्र्यांचं धक्कादायक विधान.