AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रोहित-सूर्याच्या डोळ्यादेखत श्रेयस अय्यरची जबरदस्त कामगिरी, एका उडीने सामना फिरवला Video

आयपीएल 2026 स्पर्धेतील 24व्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स यांच्यात लढत होत आहे. या सामन्यात पंजाब किंग्सने चागंली सुरूवात केली. पण चहलने झेल सोडला आणि सर्व काही बिघडलं. पण कर्णधार श्रेयस अय्यरने पुन्हा एकदा चूक सुधारत संघाला ट्रॅकवर आणलं.

रोहित-सूर्याच्या डोळ्यादेखत श्रेयस अय्यरची जबरदस्त कामगिरी, एका उडीने सामना फिरवला Video
रोहित-सूर्याच्या डोळ्यादेखील श्रेयस अय्यरची जबरदस्त कामगिरी, एका उडीने सामना फिरवला VideoImage Credit source: Screenshot/Star Sports
| Updated on: Apr 16, 2026 | 10:33 PM
Share

आयपीएल 2026 स्पर्धेत मुंबई इंडियन्स संघात तगडे खेळाडू आहेत. मात्र सलग पराभवामुळे संघाची स्थिती ढासळली आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्सचा संघ विजयाच्या शोधात आहे. असं असताना पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यात विजयी पताका फडकवण्याची तयारी सुरू आहे. मात्र तिसऱ्या षटकात दोन धक्के बसले आणि मुंबईच्या धावगतीला पावरप्लेमध्येच ब्रेक लागला. पाचव्या षटकात तिसरी विकेट मिळणारच होती पण युजवेंद्र चहलने संधी सोडली. त्यामुळे संघ अडचणीत आला. त्यामुळे तिसऱ्या विकेटसाठी पंजाब किंग्सला चांगलाच संघर्ष करावा लागला. तिसरी विकेट मिळाली आणि पुन्हा सर्व काही ट्रॅकवर आलं. या सामन्यात श्रेयस अय्यरचं क्षेत्ररक्षण पाहून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. श्रेयस अय्यरने ना झेल घेतला, ना धावबाद केले, पण सुपरमॅनप्रमाणे हवेत झेप घेऊन त्याने आपल्या संघाला एक मोठं यश मिळवून दिलं.

मार्को यानसेन पंजाब किंग्सकडून 18वं षटक टाकत होता. या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर हार्दिक पांड्याने षटकार मारला आणि पंजाबच्या अडचणीत वाढ केली. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर पुन्हा एकदा हार्दिक पांड्याने तसाच प्रयत्न केला. पण यावेळी लाँग ऑनवरून सीमापार मारण्याचा प्रयत्न फसला आणि विकेटही मिळाली. श्रेयस अय्यरने हवेत उडी घेतली आणि सीमेपार पडणार इतक्यात चेंडू आत फेकला. सीमेच्या आत असलेल्या झेव्हियर बार्टलेट चेंडू पकडण्यात चूक केली नाही. त्यामुळे हार्दिक पांड्याला बाद होत तंबूत जावं लागलं.

श्रेयस अय्यर हा झेल मुंबई इंडियन्सच्या डगआऊटजवळ पकडला. त्यामुळे त्याला अशा पद्धतीने कामगिरी करताना पाहून सूर्यकुमार यादव आणि रोहित शर्माही आश्चर्यचकीत झाले. डगआऊटच्या एक मीटर अंतरावर हा कारनामा केला. त्यामुळे हार्दिकचा डाव अवघ्या 14 धावांवर आटोपला. मुंबई इंडियन्सला 200 धावांचा पल्ला ओलांडता आला नाही. 195 धावा करून मुंबई इंडियन्सने विजयासाठी 196 दावांचं आव्हान दिलं.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...