AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Malaika Arora : ग्लॅमरस मलायका बुरख्यात दिसली अन् चाहते म्हणाले…! व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस

Malaika Arora Vidoe : मलायका अरोरा तिचा फिटनेस आणि सेन्सेशनसाठी ओळखली जाते. नुकताच तिने एक व्हिडीओ शेअर केला असून त्यात तिचा लूक पाहून अनेक जण हैराण झालेत.

Malaika Arora : ग्लॅमरस मलायका बुरख्यात दिसली अन् चाहते म्हणाले…! व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस
| Updated on: Oct 21, 2026 | 8:13 PM
Share

Malaika Arora Vidoe : बॉलीवूड दिवा मलायका अरोरा तिच्या प्रत्येक अंदाजाने, स्टाइलने लोकांच लक्ष वेधून घेते. ती फिटनेस आणि कमाल डान्स मूव्ह्जसाठी ओळखली जाते. सोशल मीडियावर देखील मलायाका बरीच ॲक्टिव्ह असते. चाहत्यांना ती तिच्या आयुष्यातील बऱ्याच गोष्टींच्या अपडेट्स देत असते. आता मलायकाने नवा व्हिडीओ शेअर केला असून तो पाहून लोकं हैराण झालेत.खरंतर मलायका सध्या दुबईत व्हेकेशनवर असून, एका व्हिडीओत ती बुरखा घालून दिसत आहे. हो, नेहमी स्टायलिश कपड्यात दिसणारी मलायका बुरख्यात दिसली. ती दुबईतील प्रसिद्ध शेख जायद ग्रँड मस्जिद मध्ये गेली होती. तेव्हा तिने काळ्या रंगाचा बुरखा घातला होता. तिथे एक व्हिडीओ शूट करून तिने तो तिच्या अकाऊंटवर शेअर केला आहे. मलायकाला मस्जिदमध्ये पाहून अनेक लोकं हैराण झाले. तिच्या व्हिडीओवर विविध कमेंट्सही आल्या आहेत.

मशिदीत मलायका अरोरा

मलायका अरोराने इन्स्टाग्रामवर एक नवीन व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती अबू धाबी येथील प्रसिद्ध शेख झायेद ग्रँड मशिदीत दिसत आहे. व्हिडिओमध्ये मलायका काळ्या रंगाचा बुरखा परिधान केलेली दिसते. बुरखा घालून ती मशिदीचे भव्य सौंदर्य न्याहाळताना दिसत आहे. तिच्या चेहऱ्यावर शांतता आणि प्रसन्नता दिसून आली. “काही ठिकाणं तुम्हाला थांबायला भाग पाडतात, तर काही ठिकाणं तुम्हाला काहीतरी खास अनुभूती देतात. या ठिकाणाने या दोन्ही गोष्टी केल्या.” असं तिने हा व्हिडिओ शेअर करत लिहीलं.

नेटकऱ्यांच्या विविध कमेंट्स

मात्र, मलायकाला बुरख्यात पाहून अनेक नेटकरी आश्चर्यचकित झाले आहेत. या व्हिडिओवर मलायकाच्या चाहत्यांच्याही प्रतिक्रिया समोर येत आहेत. अनेक चाहत्यांनी हार्ट इमोजी शेअर केला आहेत, तर काही जणांनी तिच्या या लूकचे कौतुक केले आहे. अवतारात मलायका अजिबात ओळखू येत नाहीये, असंही काही चाहत्यांनी म्हटलं. तिच्या या व्हिडीओवर अनेक लाइक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडला आहे. सध्या सर्वत्र मलायकाच्या या लूकचीच चर्चा सुरू आहे.

Follow Us
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?