AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘वय वाढतंय,लग्न काही होत नाहीए, ज्याचं लग्न होत नाही त्यांना..’ तरुणाच्या मागणीने आमदार सुरेश धस अवाक

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघासाठी निवडणूक जाहीर झाली होती. या निवडूकीचा प्रचार आज बुधवारी संपला आहे. आता 23 ऑक्टोबर 2026 ला मतदान होणार आहे. 27 ऑक्टोबरला मतमोजणी होईल. त्यानंतर निकाल जाहीर केला जाईल.

'वय वाढतंय,लग्न काही होत नाहीए, ज्याचं लग्न होत नाही त्यांना..' तरुणाच्या मागणीने आमदार सुरेश धस अवाक
mla suresh dhas news
| Updated on: Oct 21, 2026 | 9:01 PM
Share

राज्यातील विधान परिषदेच्या तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदार संघातील निवडणूकांचा प्रचाराचा धुरळा आज संपुष्ठात येत आहे. राज्यात आता या निवडणूकांत महायुतीने सर्व पाच जागा जिंकण्याचा दावा केला आहे. तर आता या निवडणूकीतही गोकुळ दूध संघाचा पॅटर्न पाहायला मिळणार का याची उत्सुकता महाविकास आघाडीला लागली आहे. आष्टी मतदार संघाचे आमदार सुरेश धस यांनी आष्टी येथे जाहीर सभा घेतली. संभाजीनगर पदवीधर निवडणूकीत महायुतीचे उमेदवार सतीश चव्हाण यांना प्रचंड मतांनी विजयी करावे असे आवाहन धस यांनी केले. यावेळी त्यांच्या प्रचार सभेत पदवीधर तरुणांनी सध्याच्या ज्वलंत प्रश्नाला हात घातला. तरुणांचे वय ३२ – ३३ झाले तरी त्यांचे लग्नं काही होत नाहीत, त्यामुळे त्यांच्यासाठी आता योजना सुरु करावी अशी मागणी या तरुणाने केली आहे. यावर आमदार सुरेश धस अवाक होऊन पाहातच राहिले.

मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी बीडच्या आष्टीत मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार सुरेश धस यांच्यासमोर भाषण करणाऱ्या एका तरुणाने आम्ही शिक्षण घेतले पदवीधर झालो, परंतु आमचे लग्न मात्र होत नाही. तेवढा लग्नाचा प्रश्न मार्गी लावा असे आवाहनच आमदार महोदयांना केले. यावेळी उपस्थितांनी देखील या तरुणाच्या मागणीला मोठा प्रतिसाद दिला. ही खरी गोष्ट आहे, आम्ही शिक्षण घेतले, बाहेर फिरतो. परंतु आमचे लग्न झालेले नाही, त्यामुळे ज्यांच्या वयाची तीस वर्षे पूर्ण होऊनही लग्न झालेले नाही अशा तरुणांना पगार सुरू करावा अशी मागणी या तरुणांनी आमदार सुरेश धस यांच्याकडे केली. यावर आमदार सुरेश धस म्हणाले की पदवीधरांचे चालले तरी काय आहे, एक उमेदवार तर तिरडीवरच अर्ज भरण्यासाठी गेला. आता हा तरुण लग्न लावून द्या म्हणतोय ? पदवीधरांचे नेमके काय चालले आहे असा सवाल यावेळी सुरेश धस यांनी उपस्थित केला.

सतीश चव्हाण यांनाच प्रचंड मतांनी निवडून द्या

आष्टी मतदार संघाचे आमदार सुरेश धस यांनी आष्टी येथे जाहीर सभा घेऊन संभाजीनगर पदवीधर निवडणूकीत महायुतीचे उमेदवार सतीश चव्हाण यांना प्रचंड मतांनी विजयी करावे असे आवाहन केले. मतदार संघाचे आमदार सुरेश धस यांनी पदवीधर निवडणूकीच्या निमित्ताने जाहीर सभा घेतली. यावेळी आमदार सुरेश धस म्हणाले की कुणी तिरडीवर आले तरी उमेदवारी अर्ज दाखल करतात. हे काय पदवीधरांचे प्रश्न सोडवणार ? तेव्हा आमदार सतीश चव्हाण यांनाच प्रचंड मतांनी विजयी करावे असे आवाहन आमदार सुरेश धस यांनी केले आहे.

Follow Us
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?