tv9 Marathi Special Report | महापालिकेत आत्म्यांचा वावर?, मंत्र्यांचं धक्कादायक विधान
राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा अंधश्रद्धेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. मंत्री संजय शिरसाट यांच्या एका धक्कादायक विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. संजय शिरसाट यांनी दावा केला आहे की, छत्रपती संभाजीनगर महापालिकेची सध्याची इमारत ज्या ठिकाणी उभी आहे, त्या जागी पूर्वी कब्रस्तान होतं. त्यामुळे त्या परिसरात आत्म्यांचा वावर असून, लोकांना अस्वस्थता जाणवते, असं त्यांनी म्हटलं आहे.
राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा अंधश्रद्धेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. मंत्री संजय शिरसाट यांच्या एका धक्कादायक विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. संजय शिरसाट यांनी दावा केला आहे की, छत्रपती संभाजीनगर महापालिकेची सध्याची इमारत ज्या ठिकाणी उभी आहे, त्या जागी पूर्वी कब्रस्तान होतं. त्यामुळे त्या परिसरात आत्म्यांचा वावर असून, लोकांना अस्वस्थता जाणवते, असं त्यांनी म्हटलं आहे. इतकंच नव्हे, तर या समस्येतून मुक्ती हवी असेल तर महापालिकेची इमारत दुसऱ्या योग्य जागी हलवावी लागेल, असंही त्यांनी सुचवलं आहे.
दरम्यान, आधीच राज्यात भूतप्रेत, जादूटोणा यांसारख्या विषयांवर चर्चा सुरू असताना, एका मंत्र्यांकडून अशा प्रकारचं विधान येणं आश्चर्यकारक मानलं जात आहे. त्यांच्या या वक्तव्यावरून राजकीय व सामाजिक स्तरावर तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचा आरोपही केला जात आहे. या प्रकरणावर पुढे काय घडामोडी होतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
Published on: Apr 16, 2026 10:43 AM
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...

