AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nashik TCS IT Case | आयटी कंपनीतील धर्मांतराचा उद्रेक... प्रत्येक नाशिककर रस्त्यावर; सकल हिंदू समाजाचा महाएल्गार

Nashik TCS IT Case | आयटी कंपनीतील धर्मांतराचा उद्रेक… प्रत्येक नाशिककर रस्त्यावर; सकल हिंदू समाजाचा महाएल्गार

| Updated on: Apr 16, 2026 | 1:15 PM
Share

नाशिक शहरात धर्मांतर प्रकरणाच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाच्या वतीने मोठा मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चाला मोठ्या प्रमाणात नागरिक आणि कार्यकर्त्यांचा प्रतिसाद मिळत असून, शहरातील वातावरण तापलं आहे. हा मोर्चा TCS कंपनी परिसरातून सुरू होऊन जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मार्गस्थ झाला आहे.

नाशिक शहरात धर्मांतर प्रकरणाच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाच्या वतीने मोठा मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चाला मोठ्या प्रमाणात नागरिक आणि कार्यकर्त्यांचा प्रतिसाद मिळत असून, शहरातील वातावरण तापलं आहे. हा मोर्चा TCS कंपनी परिसरातून सुरू होऊन जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मार्गस्थ झाला आहे. संबंधित IT कंपनीत घडलेल्या प्रकरणाच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.
मोर्चामध्ये महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून येत असून, अनेक महिलांनी भगवे वस्त्र परिधान करून, डोक्यावर भगवे फेटे व टोप्या घालून आणि हातात भगवे झेंडे घेऊन सहभाग नोंदवला आहे. तसेच, TCS ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत बाईक रॅलीही काढण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणात ‘लव्ह जिहाद’ आणि धर्मांतरासाठी दबाव टाकल्याच्या आरोपांची चौकशी सुरू असून, याबाबत National Investigation Agency (NIA) आणि विशेष तपास पथक (SIT) यांच्याकडून तपास केला जात आहे.
या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, प्रशासनाकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे.

Published on: Apr 16, 2026 01:15 PM
Follow Us