Vidhan Parishad Election 2026 | विधानपरिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर; 9 जागांसाठी 12 मे रोजी मतदान
निवडणूक आयोगाने विधानपरिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. राज्यातील 9 जागांसाठी 12 मे रोजी मतदान होणार असून, 13 मे रोजी विद्यमान सदस्यांचा कार्यकाळ संपणार आहे. या निवडणुकीत संख्याबळाचा विचार करता राजकीय गणित स्पष्ट दिसत आहे.
निवडणूक आयोगाने विधानपरिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. राज्यातील 9 जागांसाठी 12 मे रोजी मतदान होणार असून, 13 मे रोजी विद्यमान सदस्यांचा कार्यकाळ संपणार आहे. या निवडणुकीत संख्याबळाचा विचार करता राजकीय गणित स्पष्ट दिसत आहे. त्यानुसार भाजपला 5 जागा, शिवसेनेला 2 जागा, राष्ट्रवादी काँग्रेसला 1 जागा आणि महाविकास आघाडीच्या इतर घटकांना 1 जागा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, जागांच्या तुलनेत उमेदवारांची संख्या मर्यादित राहिल्यास ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे. मात्र, अधिक उमेदवार मैदानात उतरल्यास चुरशीची लढत पाहायला मिळू शकते.
या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांकडून हालचालींना वेग आला असून, उमेदवारी अर्ज आणि राजकीय रणनीतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता ही निवडणूक बिनविरोध होते की रंगतदार लढत होते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
मुलींना कॅफेत घेऊन बासायचा अन् तिथेच... अमरावती लैंगिक शोषण प्रकरणातील
TCS महिला लैंगिक शोषणातील महिला सूत्रधाराने गर्भवती असल्याचं दिलं खोटं
भाजपनं महिला आरक्षणाच्या नावाखाली एक भोंदू विधेयक आणलं; संजय राऊतांचे
खरात प्रकरणी दीपक लोंढेंची कसून चौकशी, 10 तासांच्या चौकशीत नेमकं काय घ

