AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

55 सैनिकांचे मृतदेह पाहून पाकिस्तान हादरला, थेट मध्यरात्रीच केला हवाई हल्ला, तब्बल इतक्या लोकांचा मृत्यु, मोठी खळबळ…

अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव प्रचंड वाढला असून दोन्ही देशांनी मोठी हल्ले केली. तालिबानने पाक सैन्याला टार्गेट करत हल्ला केला. आता धक्कादायक आकडेवारी पुढे येत असून मोठी खळबळ उडाली.

55 सैनिकांचे मृतदेह पाहून पाकिस्तान हादरला, थेट मध्यरात्रीच केला हवाई हल्ला, तब्बल इतक्या लोकांचा मृत्यु, मोठी खळबळ...
Afghanistan Pakistan War
| Updated on: Feb 27, 2026 | 7:33 AM
Share

काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानने मोठा हल्ला अफगाणिस्तानवर केला. त्यानंतर अफगाणिस्तानने मोठा इशारा देत म्हटले होते की, या हल्ल्याचे लवकरच आम्ही उत्तर देऊ. त्यानंतर मध्यरात्री तालिबानकडून अत्यंत मोठा हल्ला करण्यात आला. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये युद्धाची स्थिती निर्माण झाली. अफगाणिस्तानने पाकच्या अनेक सैन्य चाैक्यांवर ताबा मिळवला. अफगाण लष्करी अधिकाऱ्यांनी पाकिस्तानविरुद्ध हल्ले सुरू केल्याचे म्हटले आहे. कुनार प्रांतात इस्लामिक अमिराती सैन्याने केलेल्या कारवाईत 55 पाकिस्तानी सैनिक मारले गेले आहेत, असे इस्लामिक अमिरातीच्या प्रवक्त्याने सांगितले. पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवर मोठा तणाव बघायला मिळतोय. काही महिन्यांपूर्वीच दोन्ही देशांमध्ये युद्धाची स्थिती होती, त्यानंतर साैदी अरेबियाने मध्यस्थी करत दोन्ही देशांमधील युद्ध थांबवले. त्यानंतर गेल्याच आठवड्यात पाकिस्तानकडून रमजान सुरू असताना मोठा हल्ला अफगाणिस्तानवर करण्यात आला. आता त्यालाच हे उत्तर देण्यात आले.

पाकिस्तानच्या सीमेवरील कुरापती काही कमी होण्याचे नाव घेत नाही. अफगाणिस्तानने ठिकाणांवर ताबा घेतल्यानंतर पाकिस्तानची झोप उडाली आणि थेट अफगाणिस्तानची राजधानी काबूलवर हवाई  बॉम्बहल्ला केला. पाकिस्तानने अफगाण तालिबानविरुद्ध ऑपरेशन सुरू केले. तशी पाकिस्तानच्या रक्षा मंत्र्यांनी पोस्ट करून घोषणाही केली.

पाकिस्तानचा दावा आहे की, त्यांनी अफगाणिस्तानवर केलेल्या रात्रीच्या हल्ल्यात 130 हून अधिक लोकांचा मृत्यु झाला. दोन्ही देशातील तणाव आता शिगेला पोहोचला असून हल्ल्याची सुरूवात पाकिस्तानने केली पण अफगाणिस्तानने दिलेले उत्तर त्यांना सहन झाले नाही आणि थेट मोठा हल्ला थेट काबूलवर केला. सध्या दोन्ही देशांमध्ये तणाव वाढला आहे. रमजानच्या महिन्यात ही हल्ले केली जात आहेत.

अफगाणिस्ताने दावा केला की, पाकिस्तान केलेल्या हवाई हल्ल्यांना आम्ही प्रत्युत्तर दिले. सीमावर्ती भागात केलेल्या कारवाईदरम्यान 15 चौक्या ताब्यात घेतल्या. दुसरीकडे पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या काही प्रमुख ठिकाणांवर हल्ला केला. ज्यामध्ये 130 हून अधिक लोकांचे जीव गेले. याबाबत स्वत:पाकिस्तानने दावा केला. आता दोन्ही देशातील पेटलेले युद्ध रोखण्यासाठी नक्की कोणते देश पुढे येतात हे पाहण्यासारखे ठरेल. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या तणावाच्या स्थितीत भारताचे बारीक लक्ष आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...