AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Devendra Fadnavis | अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विधान: 2029-30 पर्यंत वन ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे लक्ष्य

Devendra Fadnavis | अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विधान: 2029-30 पर्यंत वन ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे लक्ष्य

| Updated on: Feb 26, 2026 | 2:38 PM
Share

राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या अर्थव्यवस्थेबाबत महत्त्वाकांक्षी उद्दिष्टांची घोषणा केली. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, राज्याचा उद्देश 2029-30 पर्यंत एक ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था उभारण्याचा असून 2047 पर्यंत पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था निर्माण करण्याचे ध्येय ठेवण्यात आले आहे.

राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या अर्थव्यवस्थेबाबत महत्त्वाकांक्षी उद्दिष्टांची घोषणा केली. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, राज्याचा उद्देश 2029-30 पर्यंत एक ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था उभारण्याचा असून 2047 पर्यंत पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था निर्माण करण्याचे ध्येय ठेवण्यात आले आहे. यासोबतच दरवर्षी दहा लाख रोजगारनिर्मिती करण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. तसेच दरडोई उत्पन्नात या कालावधीत जवळपास दहापट वाढ करण्याचा मानस सरकारचा आहे. राज्यात 13 ते 14 ट्रिलियन अमेरिकन डॉलर इतकी गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. प्रगत उत्पादने, आघाडीचे तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित विकास आणि वित्त सेवा क्षेत्रात राज्याला अग्रस्थानावर नेण्याचे उद्दिष्ट असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. राज्याच्या आर्थिक प्रगतीसाठी ठोस धोरणे आणि दीर्घकालीन नियोजनाच्या माध्यमातून हे लक्ष्य साध्य केले जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Published on: Feb 26, 2026 02:38 PM
Follow Us