Mustafizur Rahman ला डच्चू; बांगलादेशाची आगपाखड, T20 World Cup सामन्याविषयी मोठा निर्णय, अपडेट काय?
T20 World Cup Matches: मुस्तफिजुर रहमान याला शनिवारी आयपीएलमधून(IPL) डच्चू देण्यात आला. त्यावरून बांगलादेशमध्ये वादाचं मोहोळ उठलं. आता धार्मिक कट्टरतावाद्यांसोबतच बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने सुद्धा या वादात उडी घेतली आहे. बांगलादेशात खेळवल्या जाणाऱ्या टी-20 विश्वचषक सामन्याविषयी मोठा निर्णय घेतला आहे. काय आहे ती अपडेट?

Mustafizur Rahman Kick Out-Bangladesh Reaction: बांगलादेशातील राजकीय अस्थिरता, धार्मिक कट्टरतावाद्यांचा उच्छाद आणि काळजीवाहू सरकारची भारतविरोधी भूमिका यामुळे मुस्तफिजूर रहमान याला शनिवारी आयपीएलमधून (IPL) डच्चू देण्यात आला. BCCI ने कोलकत्ता नाईट राईडर्सला (KKR) याविषयीचे निर्देश दिले होते. दरम्यान या सर्व प्रकरणात बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (BCB) जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डाने आतंरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे माठी मागणी केली आहे. ICC ने बांगलादेशाचे टी-20 विश्वचषक सामना भारताऐवजी श्रीलंकेत खेळवावे, अशी मागणी बीसीबीने केली आहे.
टी-20 विश्वचषक सामने कोलकत्त्यात
टी-20 विश्वचषकात बांगलादेशाचे तीन सामने पुढील महिन्यात कोलकत्तामध्ये खेळवल्या जाणार आहे. बीसीबीने कोलकत्त्यात खेळाडूंच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित करत याविषयी चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी याविषयी आयसीसीला पत्र धाडलं आहे. त्यात सध्या दोन्ही देशांच्या संबंधावर माहिती देत खेळाडूंच्या सुरक्षेची चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळे भारतात खेळवले जाणारे बांगलादेशाचे तीनही सामने श्रीलंकेत खेळवण्यात यावे अी विनंती त्यांनी केली आहे.
बीसीबीची तातडीनं बैठक
शनिवारी कोलकत्ता नाईट रायडर्सने मुस्तफिजूर या बांगलादेशातील खेळाडूला हटवले. बीसीसीआयने याविषयीचे निर्देश या संघाला दिले होते. ही वार्ता धडकताच बीसीबी बोर्डाने झुमवर तातडीने एक बैठक बोलावली. त्यानंतर माध्यम समितीचे प्रमुख अमजद हुसैन यांनी ESPNCrickinfo ला याविषयीची माहिती दिली. त्यानुसार, भारतातील कोलकत्ता येथे टी-20 विश्वचषकाचे तीन सामने खेळवले जाणार आहे. पण खेळाडूंच्या सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे आम्ही आयसीसीकडे येथील सामने हे श्रीलंकेत खेळवले जावेत यासाठी विनंती केली आहे.
तर दुसरीकडे बांगलादेशाच्या अंतिम सरकारच्या क्रीडा खात्याचे सल्लागार आसिफ नजरुल यांनी भारतावर आगपाखड केली. भारतातील उजव्या गटासमोर झुकूत भारतीय क्रिकेट मंडळाने कोलकत्ता नाईट रायडर्सला मुस्तफिजुरला बाहेरचा रस्ता दाखवल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच या निर्णयाचा त्यांनी निषेध केला. त्यांनी गेल्या काही दिवसात भारतातील बांगलादेशविरोधी वातावरणाचाही उल्लेख केला. आयसीसीने आता याप्रकरणी बांगलादेशाचे भारतातील सर्व सामने श्रीलंकेत खेळवण्याची विनंती आयसीसीकडे केल्याचे ते म्हणाले. त्यामुळे आता नवीन वादाला तोंड फुटले आहे. तर दुसरीकडे भारतातही अनेक मौलवी आणि हिंदू संघटना बांगलादेश पाकिस्तानच्याच मार्गावर जात असल्याने त्याच्याशी संबंध तोडण्याची भाषा करत आहे. तसेच बांगलादेशी खेळाडूंना आयपीएलमध्ये न खेळू देण्याची भूमिका मांडत आहेत.
