IND vs PAK 2026: नवीन वर्षात पाकड्यांना कितीदा लोळवणार टीम इंडिया? इतक्यांदा भारत-पाक आमने-सामने, कॅलेंडरच पाहा
IND vs PAK 2026 : भारत आणि पाकिस्तान क्रिकेट संघातील सामने म्हणजे हायहोल्टेज ड्रामा असतो. नवीन वर्षात टीम इंडिया आणि पाक टीम इतक्या वेळा भिडणार आहेत. याविषयीचे कॅलेंडर तुम्ही पाहू शकता. इतक्यावेळा हायहोल्टेड ड्रामा रंगणार आहे.

IND vs PAK 2026 : यंदाही भारत आणि पाकिस्तान क्रिकेट संघातील हायहोल्टेज ड्रामा रंगणार आहे. दोन्ही संघ आमने-सामने येतील. गेल्या काही वर्षात दोन्ही देशातील संबंध अत्यंत नाजूक स्थितीत आहेत. पहलगाम हल्ला आणि दोन्ही देशातील संघर्षामुळे या सामन्यांना वादाची मोठी किनार आहे. अर्थात मैदानावर हात न मिळवणे आणि एकमेकांना भिडण्याचे प्रकार सरत्या वर्षातही दिसून आले. अनेकदा टीम इंडिया सुरुवातीच्या सामन्यात पाकिस्तानला लोळवते आणि मग अंतिम आणि अंतिमपूर्व सामन्यांमध्ये चुरशीचा सामना रंगतो. या सामन्यातून आयोजकांची मोठी कमाई होते. आयोजक नोटा छापतात. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेपासून (ICC) ते आशिया क्रिकेट परिषदेपर्यंत(ACC) त्यामुळेच या दोन्ही संघाचे सामने अधिकाधिक कसे होतील हे पाहतात. त्यातून या दोन्ही संघटनांची तिजोरी भरते. तर दोन्ही देशात या काळात जणू संचारबंदी लागते. या वर्षात 2026 मध्ये दोन्ही संघ पुन्हा आमने-सामने येणार आहेत.
ICC T20 World Cup 2026
पुढील महिन्यात भारत आणि श्रीलंका पुरुषांचा आयसीसी टी 20 विश्वचषकाचे 2026 (ICC T20 World Cup 2026) आयोजन करत आहेत. यामध्ये भारत आणि पाक हे दोन्ही संघ एकाच गटात खेळतील. दोन्ही संघ ग्रुप-ए मध्ये हॉलंड,नामिबिया आणि अमेरिकेसोबत असतील. दोन्ही संघात सामना होईल. 15 फेब्रुवारी रोजी हा सामना होईल. कोलंबोतील आर.प्रेमदासा स्टेडियममध्ये हा सामना होणार आहे.याशिवाय दोन्ही संघ सुपर-8, उपांत्यपूर्व आणि अंतिम सामन्यात आमनेसामने येण्याची शक्यता आहे. टीम इंडिया सध्याच्या टी20 विश्वचषकात आहे. त्यामुळे हा संघ मोठी कमाल दाखवण्याची शक्यता आहे. तर पाकिस्तान संघ पराभवाचे उट्टे काढण्यासाठी सज्ज झाला आहे.
गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये UAE मध्ये आशिया कप 2025 साठी पाकिस्तान आणि भारतात तीन सामने झाले. दोन्ही संघात चांगलीच टशन दिसून आले. या सामन्यातील ट्रॉफी पाकिस्तानच्या नेत्याच्या हातून घेण्यास भारतीय संघाने नकार दिला होता. ती ट्रॉफी अजूनही पाकिस्तानकडेच आहे. यावेळी असं काही होण्याची शक्यता दिसून येत नाही.
तर यंदा झिम्बॉब्वे आणि नामिबिया हे दोन देश आयसीसी अंडर-19 विश्वचषकाचे (ICC U-19 Men’s ODI World Cup) आयोजन करत आहेत. भारतीय संघ आयुष म्हात्रे (Ayush Mhatre) याच्या नेतृत्वात खेळत आहे. तर या सामन्यात स्फोटक फलंदाज वैभव सूर्यवंशी (Vaibhav Suryavanshi) हा पण दिसेल. दोन्ही संघाना वेगवेगळ्या गटात ठेवण्यात आले आहे. टीम इंडिया ग्रुप-ए मध्ये तर पाकिस्तान हा गट-ब मध्ये आहे. गटाच्या स्तरावर दोन्ही संघात सामना होणार नाही. पण सुपर-6 मध्ये मात्र दोन्ही टीम भिडण्याची शक्यता आहे. उपांत्यपूर्व आणि अंतिम सामन्यात दोन्ही संघात सामना होण्याची शक्यता आहे. गेल्या महिन्यात 19 वर्षाखालील आशिया कपच्या सामन्यात भारतीय संघाचा पाकिस्तानने दारून पराभव केला होता.
तर इंग्लंडमध्ये महिला टी20 विश्वचषकाचे (ICC Women’s T20 World Cup) आयोजन करण्यात येणार आहे. या विश्वचषकात ही भार आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ एकाच गटात आहेत. या गटात ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका संघ पण आहेत. भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सामना 14 जून रोजी बर्मिंघममध्ये खेळण्यात येईल. तर याचवर्षी एशियन गेम्स 2026 (Asian Games 2026) चे आयोजन करण्यात आले आहे. हे सामने 19 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबरपर्यंत जपानमधील एईची आणि नागोया येथे होईल.
