AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ZIM : जिंकलो, पण यापुढे सूर्याने त्याच्या हातात चेंडू देण्याआधी दहावेळा विचार करावा, कारण आता हरलो तर संधी नाही

IND vs ZIM : टीम इंडियाने काल 72 धावांनी मोठा विजय मिळवला. पण तरीही टीम इंडियासमोर काही प्रश्न आहेत. गोलंदाजीच्या बाबतीत कॅप्टन सूर्यकुमार यादवने पुन्हा अशी चूक केली तर संधी मिळणार नाही. कारण यापुढचा प्रत्येक सामना भारतासाठी करो या मरो आहे.

IND vs ZIM : जिंकलो, पण यापुढे सूर्याने त्याच्या हातात चेंडू देण्याआधी दहावेळा विचार करावा, कारण आता हरलो तर संधी नाही
Surya-Gambhir
| Updated on: Feb 27, 2026 | 10:26 AM
Share

टी20 वर्ल्ड कप 2026 मध्ये टीम इंडियाने सेमीफायनल प्रवेशाच्या अपेक्षा जिवंत ठेवल्या आहेत. भारताने सुपर-8 मधील दुसरा सामना खेळताना झिम्बाब्वेवर 72 धावांनी विजय मिळवला. गुरुवारी चेन्नईच्या एमए चिंदमबरम स्टेडियमवर हा सामना झाला. टीम इंडियातील बहुतांश खेळाडूंसाठी कालच दिवस चांगला होता. अपवाद फक्त शिवम दुबेचा. हा दिवस शिवम दुबेला लक्षात ठेवायला अजिबात आवडणार नाही. त्याला काल फलंदाजीची संधी मिळाली नाही. पण बॉलिंगचा चान्स मिळाला तेव्हा त्याने पार निराश केलं. झिम्बाब्वे सारख्या टीम विरुद्ध त्याने खूप वाईट गोलंदाजी केली.

झिम्बाब्वेच्या फलंदाजांनी त्यांच्या गोलंदाजीवर खोऱ्याने धावा लुटल्या. चौफेर फटकेबाजी केली. सुमार गोलंदाजीमुळे शिवम दुबेच्या नावावर दोन लाजिरवाण्याच रेकॉर्ड्सची नोंद झाली. शिवम दुबेने फक्त 2 ओव्हर गोलंदाजी केली. त्यात त्याने 46 धावा दिल्या. कुठल्याही बॉलरने टी20 वर्ल्ड कपमध्ये पहिल्या दोन ओव्हरमध्ये इतक्या धावा देण्याची ही पहिलीच वेळ आहे. दुबेने दोन नो-बॉल टाकले. टी20 वर्ल्ड कप 2026 मध्ये शिवम दुबेच्या नावावर आता 5 नो-बॉल झाले आहेत. कुठल्याही टी20 वर्ल्ड कपमध्ये एखाद्या बॉलरने इतके नो-बॉल टाकण्याची ही पहिली वेळ आहे.

भारताने आतापर्यंत किती नो-बॉल टाकलेत?

महत्वाचं म्हणजे शिवम दुबेचा टीम इंडियात ऑलराऊंडर म्हणून समावेश केला जातो. मूळात म्हणजे भारताने आतापर्यंत सात नो-बॉल टाकले आहेत. कुठल्याही वर्ल्ड कपमध्ये एकाच टीमने इतके नो-बॉल टाकण्याची हि पहिली वेळ आहे.

त्याच्या हातात चेंडू देण्याआधी दहावेळा विचार करा

शिवम दुबेने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुद्धा अशीच खराब गोलंदाजी केली होती. त्याने 2 ओव्हरमध्ये 32 धावा मोजून एक विकेट काढला होता. त्यामुळेच दक्षिण आफ्रिकेच्या टीमला 187 धावापर्यंत मजल मारता आली होती. यापुढचा प्रत्येक सामना टीम इंडियासाठी करो या मरो आहे. सलग दुसऱ्यांदा टी20 वर्ल्ड कप उंचावण्याचा टीम इंडिया विचार करत असेल, तर यापुढच्या प्रत्येक सामन्यात शिवम दुबेच्या हाती चेंडू देण्याआधी टीम इंडियाने दहावेळा विचार करावा.

Follow Us
तपोवननंतर कुसुमाग्रज उद्यानात झाडं तोडली; नाशिककरांची नाराजी
तपोवननंतर कुसुमाग्रज उद्यानात झाडं तोडली; नाशिककरांची नाराजी.
कृष्णेच्या पात्रात 3 दिवसांपासून हजारो माशांचा मृत्यू!
कृष्णेच्या पात्रात 3 दिवसांपासून हजारो माशांचा मृत्यू!.
नोटबंदीनंतर तब्बल 9 वर्षांनी सापडल्या लपवून ठेवलेल्या जुन्या नोटा!
नोटबंदीनंतर तब्बल 9 वर्षांनी सापडल्या लपवून ठेवलेल्या जुन्या नोटा!.
मुंबईत कॉलेजचं नाव गुजरातीत! हा महाराष्ट्र आहे की गुजरात?
मुंबईत कॉलेजचं नाव गुजरातीत! हा महाराष्ट्र आहे की गुजरात?.
टिपू चांगला की वाईट यावर आक्षेप नाही...; फडणवीसांनी घेतला समाचार
टिपू चांगला की वाईट यावर आक्षेप नाही...; फडणवीसांनी घेतला समाचार.
अजित पवार अपघात प्रकरणी सीआयडीने पत्रकार परिषद घेत दिली मोठी माहिती
अजित पवार अपघात प्रकरणी सीआयडीने पत्रकार परिषद घेत दिली मोठी माहिती.
अपघातात गुन्हेगारी कृत्य घडलं का? याचा तपास सुरु; सीआयडीची माहिती
अपघातात गुन्हेगारी कृत्य घडलं का? याचा तपास सुरु; सीआयडीची माहिती.
चोरीची ट्रॅव्हल्स शिरोली टोल नाक्यावर आदळली; नेमकं काय घडलं?
चोरीची ट्रॅव्हल्स शिरोली टोल नाक्यावर आदळली; नेमकं काय घडलं?.
चांदवडमध्ये शेतकऱ्यांचे आमरण उपोषण; आज मुंबई-आग्रा महामार्गावर....
चांदवडमध्ये शेतकऱ्यांचे आमरण उपोषण; आज मुंबई-आग्रा महामार्गावर.....
अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विधान....
अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विधान.....